• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : देवी देवतांपासून ते पितरांपर्यंत, घरात फोटो लावण्याचे हे नियम जाणून घ्या, आयुष्यात पैसा कधी कमी पडणार नाही

March 6, 2026 by admin Leave a Comment


घर हे केवळ विटा, सिमेंट आणि वाळू यांचं मिश्रण करून बांधलेली एक वास्तु नाहीये, तर त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या भावना, त्यांच्या आशा अपेक्षा, विचार, नातेसंबंध या सर्वांचं मिळून एक परिपूर्ण घर तयार होतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराबद्दल प्रचंड जिव्हाळा असतो. आपण आपलं घर सजवण्यासाठी अनेकदा महागड्या पेंटिंग्स, फोटो वापरतो. तसेच घरावर सदैव देवी देवतांचे आशीर्वाद राहावेत यासाठी घरात देवी देवतांचे फोटो देखील लावतो. एवढंच नाही तर आपल्या पुर्वजांचं आपल्याला स्मरण व्हाव यासाठी त्यांचे फोटो देखील घरात लावले जातात. या सर्वांमुळे घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होते. मात्र असे फोटो लावताना देखील वास्तुशास्त्राच्या काही नियमांचं पालन करावं लागतं जर त्या नियमांचं पालन केलं गेलं नाही तर घरात वास्तुदोष निर्माण होतो. नकारात्मक शक्ती तयार होते, ज्याचा प्रचंड त्रास तुम्हाला होऊ शकतो. हातात पैसा टिकत नाही, मानसिक शांती मिळत नाही, अशा विविध समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात घरात फोटो लावण्याचे नियम काय आहेत? त्याबद्दल.

देवी देवतांचे फोटो – देवी देवतांचे फोटो घरात लावताना नेहमी एक काळजी घेतली गेली पाहिजे ती म्हणजे देवी देवतांचा फोटो हा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच लावला गेला पाहिजे. तो तुम्ही ईशान्य कोपऱ्यात देखील लावू शकता. कारण ईशान्य ही दिशा देवाची दिशा मानली जाते. देवतांचा फोटो लावताना नेहमी एक काळजी घेतली गेली पाहिजे, ती म्हणजे फोटोची फ्रेम ही कुठेही तडा गेलेली नसावी.

पित्रांचा फोटो – पित्रांचा फोटो हा नेहमी दक्षिण दिशेलाच लावावा, तो इतर दिशेला लावू नये, कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते. तसेच पित्रांचा फोटो हा कधीही तुमच्या देवघरात ठेवू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

कुटुंबाचे फोटो – घरात कुटुंबाचे फोटो हे नेहमी दक्षिण पश्चिम दिशेलाच लावावेत, कारण यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होते, तसेच दक्षिण पश्चिम दिशेला नात्यांमधील मजबुतीचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे या दिशेला फोटो लावल्यास कुटुंबातील सदस्यांचं एकमेंकांबद्दल असलेलं प्रेम, जिव्हाळा अपुलकी आणखी वाढते. तसेच घरामध्ये कुटुंबातील सदस्यांचा फोटो लावताना तो नेहमी हसऱ्या चेहऱ्यांचाच लावावा. फ्रेम कुठेही तुटलेली नसावी.

घरात हे फोटो लावू नये – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही हिंस्त्र प्राणी, काटेरी झुडपे, युद्ध, मावळता सूर्य यासारखी फोटो लावू नयेत, कारण याचा परिणाम तुमच्या मनावर होऊन मन अस्वस्थ होण्याची शक्यता असते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?
  • Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
  • tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत
  • Monalisa Bhosale: मोनालिसा भोसलेच्या लग्नात मोठा ट्विस्ट, महिनाभरातच नवरा फरमान जाणार तुरुंगात?
  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in