• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : तुळशीजवळ दिवा कधी लावावा, जाणून घ्या वास्तुशास्त्रात काय नियम सांगितलेत?

March 26, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घराला आर्थिक स्थैर्य लाभते, अशा घरात कधीही पैशांची कमी नसते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळस हे झाडं भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, अशा घरावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. अशा घरात कधीही आर्थिक समस्या निर्माण होत नाहीत, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तुळशीचं जेवढं धार्मिक महत्त्व आहे, तेवढंच आयुर्वेदिक महत्त्व देखील आहे. परंतु आज आपण तुळशीचं धार्मिक महत्त्व जाणून घेणार आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरात दोन प्रकारची ऊर्जा असते, एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुम्हाला तुमच्या घरात वेगवेगळ्या समस्या जाणवू शकतात. परंतु जर तुमच्या घरात तुळस असेल तर घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन ऊर्जा संतुलन निर्माण होते, ज्याचा तुमच्या सर्व कुटुंबावर सकारात्मक प्रभाव पडतो, सर्व प्रकारचे दोष दूर होतात.

अशी करा तुळशीची पूजा

वास्तुशास्त्रानुसार सकाळी अंघोळ केल्यानंतर दररोज तुळशीला जल अर्पण करून तुळशीची प्रार्थना करावी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, तुळशीला कधीही रविवारी आणि एकादशीच्या दिवशी जल अर्पण करू नये, तसेच सायंकाळच्या वेळी तुळशीचे पानं कधीही तोडू नये. तुळशीची दररोज पूजा केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वास्तुदोष दूर होतो आणि भगवान विष्णू तसेच लक्ष्मी माता याचा आशीर्वाद सदैव घरावर राहतो, त्यामुळे तुमच्या घरात कधीही आर्थिक समस्या जाणवत नाहीत.

तुळशीजवळ दिवा लावण्याचा नियम

वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्यावेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आधी तुळशीला अगरबत्ती लावावी, त्यानंतर दिवा लावावा. तुळशीला तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. तुम्ही जर तुळशीला नियमित दिवा लावत असाल तर तुळशी मातेच्या कृपेनं तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. दिव्याचं तोंड हे नेहमी तुळशीकडेच असावं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी, दिव्याचं तोंड कधीही दक्षिणेकडे करू नये. तसेच दिवा लावण्यानंतर तुम्ही तुळशीला फुलं देखील अर्पण करू शकता.

या चुका करू नका

जर तुमच्या घरात तुळस असेल तर कधीही सायंकाळच्यावेळी तुळशीचे पान तोडू नका, तसेच तुळस ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाची नियमित स्वच्छता करा. तुळशी वृंदावनाच्या शेजारी किंवा त्या परिसरात कधीही चप्पल बुट ठेवू नका. तुळशीची दररोज पूजा करा, फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत
  • धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा
  • ऑपरेशन टायगर नेमकं कधी? शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट महिनाच सांगितला; ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप?
  • Eknath Shinde: ठाकरेंचे खासदार फोडणार? एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले, एक दीड वर्षापासून… पडद्यामागे काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in