• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय

April 9, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये कापराला मोठं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर नित्यनियमाने दररोज घरात कापूर लावला तर सर्व प्रकारचे वास्तुदोष त्यामुळे दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर शुभ प्रभाव पडतो. घराला आर्थिक स्थैर्य लाभते. अनेकांच्या आयुष्यात अडचणी असतात. खूप कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही. अनावश्यक गोष्टींवरील खर्च वाढतो, तसेच तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर ते तुम्ही कितीही फेडायचा प्रयत्न केला तरी देखील ते काही फिटत नाही. उलट कर्ज वाढतच जातं, अशा अनेक प्रकारच्या समस्या तुम्ही कापराच्या सोप्या उपायांनी दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळा – वास्तुशास्त्रानुसार या सोप्या उपायामुळे तुमच्या आसपास जेवढी काही नकारात्मक ऊर्जा असते, ती नष्ट होते. तुम्हाला शांत झोप लागते. तसेच तुमचं मन देखील शातं होतं.

शुक्रवारी कापूर आणि लवंग एकत्रित जाळा – जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात, हातात पैसा टिकत नाही. डोक्यावर कर्ज झालं आहे. तर हा उपाय तु्मच्यासाठीच आहे. दर शुक्रवारी कापूर आणि काही लंवगा एकत्र करून त्यांना जाळा. यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते. लक्ष्मीत मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या सर्व संकटांचा नाश होतो. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

कापूर आणि मनी प्लांट – कितीही कष्ट केले, कितीही पैसे कामावले तरी देखील तुमच्या हातात पैसे उरत नसतील. घरात खर्च वाढला असेल, पैशांची बत होत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुमच्या घरातील मनी प्लांट जवळ कापूर ठेवा, यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील, तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल.

धन प्राप्तीसाठी – जर तुमच्या घरातील धनाची आवक ठप्प झाली असेल, तर अशावेळी घरात धनाची आवक वाढण्यासाठी दररोज सकाळी अंघोळीनंतर घरात कापूर जाळा यावेळी महालक्ष्मी मातेच्या स्त्रोताचं पठण किंवा मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.

कापराची आरती – जर तुम्हाला शनी दोष किंवा शनीासाडेसातीचा त्रास असेल तर दर शनिवारी कापराची आरती करा, यामुळे शनी देव प्रसन्न होतात, आणि सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in