• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात शिवलिंगाची स्थापना करताना या नियमांचं पालन कराच, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष

March 6, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मशास्त्रानुसार दोन पद्धतीने शिवलिंगाची स्थापना करता येते. एक प्राणप्रतिष्ठा करून आणि दुसरी चल प्रतिष्ठा. जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना करणार असता तेव्हा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली जाते, हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले सर्व धार्मिक विधी केले जातात आणि नंतर मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली जाते. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील देवघरात शिवलिंगाची स्थापना करत असता तेव्हा ती चल प्रतिष्ठेद्वारेच करावी असं धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. घरात शिवलिंग स्थापन करण्याचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरात शिवलिंग स्थापन करता, तेव्हा सर्व नियमांचं पालन हे केले गेलंच पाहिजे, अन्यथा घरात वास्तुदोष निर्माण होतो. आज आपण या संदर्भातील नियम जाणून घेणार आहोत. जे हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत.

हिंदू धर्मशास्त्रानुसार घरात नेहमी नर्मदेश्वर शिवलिंगाचीच स्थापना करावी. कारण या शिवलिंगाची निर्मिती ही नैसर्गिकतेतल्या होते, असं मानलं जातं. तसेच घरात नर्मदेश्वर शिवलिंग असणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. जेव्हा तुम्ही घरात शिवलिंगाची स्थापना करतात तेव्हा त्याचा आकार किती आहे, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, घरात फार मोठं शिवलिंग स्थापन करून नये. घरात स्थापन होणाऱ्या शिवलिंगाचा आकार सर्वसामान्यपणे बोटाच्या अंगठ्या एवढा असावा, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच तुम्ही जेव्हा घरात शिवलिंग स्थापन करता, त्यानंतर दररोज या शिवलिंगाची पूजा करणं गरजेचं असतं. प्रत्येक दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करावं, बेलपत्र महादेवांना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे पुजेनंतर शिवलिंगाला बेलपत्रे अर्पण करावीत. गंध लावावा, व न चुकता दररोज साखरेचा का होत नाही, पण नैवेद्य दाखवावा, यामुळे तुमच्यावर सदैव महादेवांची कृपा राहते, तुमची प्रगती होते, घरात सुख, शांती समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

पूजा करताना ही चूक करू नका

शिवलिंगाची पूजा करताना प्रामुख्याने दोन गोष्टी टाळाव्यात एक तर महादेवांना कधीही तुळशीचं पान अर्पण करू नये, तसेच लाल फुल देखील अर्पण करू नये. महादेवांना पांढरी फुलं ही खूप प्रिय असतात त्यामुळे महादेवांना नेहमी पांढीरी फुलं अर्पण करावीत. देवघराची नियमित स्वच्छता करावी. तसेच अंघोळीनंतर शिवलिंगासमोर बसून तुम्ही जर महादेवांचं नामस्मरण केलं तर त्यामुळे तुमच्यावर सदैव महादेवांची कृपादृष्टी राहते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा
  • लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
  • Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…
  • टोयोटाचा धमाका! अवघ्या 40 महिन्यांत विकल्या गेल्या 2 लाख गाड्या, ‘या’ 7 सीटर कारने उडवली झोप, किंमत फक्त..
  • छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in