• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात वाळलेल्या तुळशीचं झाडं का ठेवू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?

March 9, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तुळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहतो. अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, सर्व प्रकारचे आर्थिक संकटं दूर होतात. त्यामुळे घरात तुळशीचं झाड असावच असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. फक्त तुळशीचं झाड लावलं म्हणजे काम झालं असं नाही, तर हिंदू धर्मशास्त्रानुसार दररोज सकाळी अंघोळीनंतर तुळशीची पूजा करावी, तुळशीला जल अर्पण करावं, तसेच सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा, त्यामुळे आपल्याला अपेक्षित फळ मिळतं. घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. मात्र जरी असं असलं तरी देखील घरात वाळलेली तुळस ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे?

तुळस वाळणे शुभ की अशुभ? घरात असलेली तुळस जर अचानक वाळली तर वास्तुशास्त्रामध्ये त्याला शुभ माण्यात आलं आहे, कारण असं मानलं जातं की जेव्हा तुळस अचानक वाळते, तेव्हा आपल्या घरावरील फार मोठं एखादं संकट टळलं आहे. आपल्या घरावर येणारं संकट हे तुळशीच्या कृपेनं दूर झालं आहे, त्यामुळे तुळस वाळते. त्यामुळे जर अचानक तुळस वाळली तर असं समजावं की आपल्या घरावरील फार मोठं संकट टळलं आहे. जर घरातील तुळस अचानक वाळली तर तिला नमस्कार करावा, तिच्या समोर दिवा लावावा, त्यानंतर ही तुळस वाहत्या पाण्यात विसर्जित करावी, किंवा अशा तुळशीपासून माळ तयार करावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

वाळलेली तुळस घरात का ठेवू नये- वाळलेली तुळस घरात ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होत असतो. जेव्हा तुमच्या घरातील तुळस अचानक वाळते तेव्हा तिच्या जागी नवीन तुळशीचं रोप लावावं, तसेच जी वाळलेली तुळस आहे, तिचं विसर्जन वाहत्या पाण्यात करावं, किंवा तिच्यापासून माळ तयार करावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in