• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय

April 9, 2026 by admin Leave a Comment


अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपण प्रचंड पैसा कमावतो, मात्र पैसा घरात टिकत नाही. आपण कितीही पैसा कमावला तरी देखील तो कमीच पडतो. घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. जर आपण एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल ते देखील कमी न होता वाढतचं जातं. अशा स्थितीमध्ये काय करावं? असा अनेकांना प्रश्न पडतो. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे योग्य आर्थिक नियजोन, अनावश्यक बाबींवर पैसा खर्च न करणं आणि पैशांची योग्य गुंतवणूक. हे झाले आर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून उपाय. परंतु या उपायांनाच जर अध्यात्माची जोड मिळाली तर तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचं फळ डबल मिळू शकतो. आज आपण असाच एक उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्यावर जर कर्ज असेल तर तुम्ही लवकरच कर्जमुक्त व्हाल एवढंच नाही तर तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य देखील लाभेल आणि तुमच्या सर्वा प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील.

वास्तुशास्त्रानुसार घरात लाल मुंग्या निघणं हे अतिशय शुभ असतं. अनेकजण या मुंग्यांना मारून टाकतात. पंरतु वास्तुशास्त्रानुसार जर घरात अशा मुंग्या निघत असतील तर तो तुमच्यासाठी अकस्मात धनाचा योग असतो. त्यामुळे या मुंग्यांना कधीही मारलं नाही पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. कधी जर तुमच्या घरात अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना न मारता पिठाच्या कणकेचे छोटे-छोटे गोळे करा, त्यामध्ये थोडा गूळ मिक्स करा आणि हे अन्न मुंग्यांना खायला द्या. यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हा प्रयोग तुम्ही दररोज केला तर तुमच्या घरातील सर्व प्रकाच्या आर्थिक समस्या हळुहळु नष्ट होतील आणि तुमची तिजोरी पैशांनी भरून जाईल.

घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची उत्तर दिशा ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण ही दिशा धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे. घराची ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच तुमच्या घरात उत्तर दिशेच्या भिंतीला कुबेरांचा एखादा फोटो लावा किंवा तुमच्या घरातील देवघरात लक्ष्मी माता आणि कुबेर यांची प्रतिमा ठेवावी. लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. ज्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो, त्या घरात कधीही पैशांची कमी नसते. त्यामुळे नित्यनियमाने सकाळी अंघोळीनंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी. यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य लाभेल, घरात सुख शांती येईल आणि तुमची भरभराट होईल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in