• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, वर्षभर तिजोरी पैशांनी भरलेली राहील

March 9, 2026 by admin Leave a Comment


गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. याच दिवसापासून नवीन वर्षाला प्रारंभ होतो. महाराष्ट्रासह देशभरात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून आणि पुरणपोळी करून नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जातं. येणारं नवीन वर्ष आपल्याला सुखा समाधानाचं जावं, भरभराटीचं जावं, नवीन वर्षामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडवून याव्यात आपली प्रगती व्हावी, अशी सर्वांची इच्छा असते. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे उपाय जर गुढीपाडव्याच्या दिवशी केले तर घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते. उत्तम आरोग्य आणि धन संपदा लाभते अशी मान्यता आहे.चला तर मग आज आपण या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, अंघोळ करून देवाची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी, एक गोष्ट लक्षात ठेवा वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला खूप महत्त्व आहे. कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. याच दरवाजातून घरात नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे लक्षात ठेवा गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाजाची स्वच्छता झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी मुख्य दरवाजाजवळ ठेवा. हा तांब्या शक्यतो पितळ, तांबा अशा धातूंचा असावा. यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, अशी मान्यता आहे.

या उपायामुळे वर्षभर घरात कधीही पैशांची कमी जाणवत नाही, तिजोरी पैशांची भरलेली राहते. हातात आलेला पैसा टिकतो, तसेच घराला स्थैर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. या व्यतिरिक्त गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घराला तोरण लावा, मात्र तोरण लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे तोरण कधीही कृत्रिम फुलांचं नसावं. तोरण बनवता झेंडूंच्या फुलांचा आणि अंब्यांच्या पानाचा वापर करावा, यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट हेते, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in