
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरातील विविध समस्यांवर अध्यात्मिक दृष्टिकोनातून उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या पूर्ण घरावर होतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र या उलट जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते असं वास्तुशास्त्र सांगतं. आपण अशा अनेक छोट्या -छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यालाच आपण वास्तुदोष देखील म्हणतो. वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे जरी तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल किंवा तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील तर त्या दूर होतात. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, त्यातीलच एका झाडाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रामध्ये रबर प्लांटला खूपच शुभ मानण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये रबर प्लांटला आर्थिक समृद्धी आणि धनाचं प्रतिक मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या आर्थिक समस्येमध्ये अडकला आहात, प्रचंड कष्ट करून खूप पैसा कमवता, मात्र हातात पैसा टिकत नाही, तसेच कर्जबाजारी झाला आहात, कर्ज फीटत नाहीये, अशा स्थितीमध्ये घरात रबर प्लांट लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. घरात रबर प्लांट लावल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते, आणि हळुहळु तुम्हाला आर्थिक स्थौर्य प्राप्त होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. रबर प्लांटचे गोल आणि जाड पानं ही पैशांचं प्रतिक मानली जातात.
जर घरात पैसा टिकत नसेल तर तुम्ही या सोबतच आणखी एक उपाय करू शकता, तो म्हणजे उत्तर दिशा ही धनाची देवता असलेल्या कुबेराची आवडती दिशा असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावू शकता, किंवा तुमच्या देवघरात कुबेराची प्रतिमा ठेवा यामुळे देखील घरात आर्थिक स्थौर्य प्राप्त होण्यास मदत होते. तिजोरीमध्ये पैशांची आवक सुरू राहते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply