• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

March 11, 2026 by admin Leave a Comment


अनेकदा आपण खूप पैसा कमावतो, मात्र तो आपल्या हातात टिकत नाही. आपण पैशांच्या बचतीचा खूप प्रयत्न करतो मात्र त्यात यश येत नाही. एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलेलं असतं, तो हे कर्ज फेडण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र त्याला त्यात अपयश येतं. एखाद्या व्यक्तीचं सगळं सुरळीत सुरू असतं, मात्र अचानक एखादं मोठं आर्थिक संकट त्याच्यासमोर येत आणि तो अशा परिस्थितीमध्ये निराश होतो. अनेकदा या सर्व परिस्थितीसाठी आपण आपल्या नशीबाला दोष देतो. मात्र या सर्व गोष्टी घडण्यामागे एकटं तुमचं नशीबच जबाबदार नसतं, तर त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. आता अनेकांना असाही प्रश्न पडतो की घरात निर्माण झालेला वास्तुदोष नेमका कसा ओळखायचा? जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील, घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होत असतील, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला वारंवार आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतील, किंवा तुमच्यावर असलेलं कर्ज जर वाढतच चाललं असेल तर ही वास्तुदोषाची लक्षणं आहेत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण कर्जापासून मुक्तीचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

गुरुवारी करा हे उपाय – जर एखाद्यावर आर्थिक दबाव आहे, किंवा त्याच्यावर कर्ज झालं आहे, कितीही कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते फिटत नाही, अशा व्यक्तींसाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तींनी दर गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. भगवान विष्णू यांना हरभर्‍याची डाळ आणि गूळ अर्पण करावा. यामुळे कर्जाशी संबंधित तुमच्या सर्व समस्या दूर होतील असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही दर शनिवारी गरजू व्यक्तीला काळे तीळ दान करू शकता. यामुळे तुमच्यावर शनी देव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील, अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे.

धन प्राप्तीसाठी उपाय – धन प्राप्तीसाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातील काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी, घराच्या उत्तर दिशेला कोणंतही भंगार सामान, रद्दी अशा वस्तू ठेवू नये. कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची आवडती दिशा आहे. तसेच उत्तर दिशेला कुबेर यांचा एक फोटो लावावा. देवघरामध्ये लक्ष्मी मातेची एक मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी, लक्ष्मी माता ही धनाची देवता आहे, तिची नित्य नियमाने पूजा करावी. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, या उपायांमुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील, तसेच सध्यांकाळच्या वेळी कोणालाही मीठ, कात यासारख्या वस्तूंचं दान करू नये, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 5 मिनिट, 5 सेकंदाचं सर्वात रोमँटिंक गाणं, जुन्या प्रेमाला भेटण्याची होईल इच्छा; आजही लोकांचं सर्वात फेव्हरेट!
  • रणवीर सिंगच्या अभिनेत्रीला डेट करतोय अर्शदीप सिंह? ‘मिस्ट्री गर्ल’सोबत काही फोटो समोर येताच…
  • EPFO withdrawal rules: आता UPI माध्यमातून काढा PF, नवीन नियम जाणून घ्या नाहीतर अटकणार क्लेम!
  • Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ
  • Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in