• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra: ऑफिसच्या डेस्कवर चुकूनही ठेवू नका या वस्तू, ठरतात प्रगतीमधील मोठा अडसर

March 13, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त व्हाव, मात्र अनेकदा असं होतं की खूप कष्ट करून देखील कामामध्ये, व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळत नाही. जर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या मनासारखं यश मिळालं नाही तर आपण निराश होतो, आपण त्यासाठी आपल्या नशीबाला दोष देतो. मात्र या सर्व गोष्टींसाठी केवळ आपलं नशीबच जबाबदार नसतं, तर घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील या गोष्टींसाठी कारणीभूत असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार जसं तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो, तसाच वास्तुदोष हा तुमच्या ऑफिसमध्ये देखील निर्माण होऊ शकतो. ऑफिस हे प्रोफेशनल एनर्जी आणि प्रोडक्टिव्हिटीचं केंद्र आहे. त्यामुळे काही विशिष्ट गोष्टी या तुम्ही जर तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा ठरू शकतात.

खाऊन उरलेले अन्नपदार्थ – वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर कधीही खाऊन उरलेले अन्नपदार्थ किंवा खरकटी भांडी ठेवू नयेत. स्वच्छता आणि वास्तुशास्त्र अशा दोन्ही दृष्टीकोनातून ही कृती अयोग्य मानली जाते. जर तुम्हालाही तुमच्या डेस्कवर उरलेले अन्नपदार्थ, चहाचे कप, तसेच खरकटी भांडी ठेवण्याची सवय असेल तर आजच सावध व्हा, कारण यामुळे प्रचंड नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होतो. अशा वातावरणामुळे तुमचं कामात मन लागत नाही, एकाग्रता भंग होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

सुकलेले फुलं किंवा झाडं – वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर कधीही सुकलेली झाडं किंवा फुलं ठेवू नयेत, सुकलेली फुलं किंवा सुकलेलं झाडं हे मृत्यूचं प्रतिक मानलं जातं. जर डेस्कवर अशी झाडं असतील तर ऑफीसमध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या कामावर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

जुने आणि उपयोगी नसलेले कागदपत्र – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही ऑफिसमध्ये जिथे बसता तो डेस्क हा स्वच्छ असावा. त्या डेस्कवर जास्त राडा असू नये. तसेच जी कागदपत्रं तुमच्या उपयोगाची नाहीत ती उगाच डेस्कवर जमा करून ठेवू नये. यामुळे नकारात्माक ऊर्जा निर्माण होते, तसेच आपल्याला कामाचा फार जास्त ताण आला आहे, अशी आपली भावना होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तुटलेल्या वस्तू – वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तू घरात किंवा ऑफिसमध्ये कुठेही ठेवणं हे अशुभ आहे. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. तुम्हाला त्याचा आर्थिक फटका बसू शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in