• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या चार वस्तू, पैशांच्या सर्व समस्या होतील दूर

March 22, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा काही चूका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण वास्तुदोषामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र आणि ज्योतिशास्त्रामध्ये पाण्याला चंद्राचं प्रतिक मानलं गेलं आहे. जर आपण अंघोळीच्या पाण्यात आपल्या घरातील काही विशिष्ट गोष्टी मिसळून त्या पाण्याने अंघोळ केली तर वास्तुदोष दूर होतो. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

सैंधव मीठ – मीठामुळे ऊर्जा साफ होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असं मानलं जातं. जर तुम्ही कोमट पाण्यात थोड सैंधव मीठ टाकून त्या पाण्यानं अंघोळ केली तर तुमचं वाईट ऊर्जेपासून संरक्षण होतं. तसेच तुम्हाला कोणाची नजर लागली असेल तर ती देखील यामुळे दूर होते. तुमच्या पैशांशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तेजपत्ता – तेजपत्ता ही केवळ खाण्याचीच गोष्ट नाही तर तेजपत्त्याला यशाचं प्रतिक देखील मानलं जातं. जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडासा तेज पत्ता मिसळून अंघोळ केली तर तुमची सर्व कामे मार्गी लागतात. तसेच तुमच्या आत्मविश्वासात देखील वाढ होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

लवंग – लवंगेला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे. जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात लवंग टाकून अंघोळ केली तर तुमचं नशीब उजळतं, तुमचे अडलेले सर्व कामे मार्गी लागतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

गुलाबाच्या पाकळ्या – गुलाबाच्या पाकळ्या जर अंघोळीच्या पाण्यात मिसळल्या तर सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, मनाला शांती मिळते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडई क्रेटा आता नव्या अवतारात! जबरदस्त समर एडिशन लाँच, किंमत किती?
  • सांगलीत अघोरी विद्येचा थरार… स्मशानभूमीत सापडली काळी बाहुली अन्… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • Gold Rate : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, नवे दर जाहीर; एका तोळ्यासाठी मोजावे लागणार…
  • IPL 2026 : आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणारे 5 फलंदाज, अनकॅप्ड खेळाडू पहिल्या स्थानी
  • Ashok Kharat | रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in