• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vanita Kharat Home Video: १० बाय १० च्या घरातून थेट 23व्या मजल्यावर घर, वनिता खरातचे घर आतुन पाहिलेत का?

February 7, 2026 by admin Leave a Comment


मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या आनंदी बातम्यांचा पाऊस पडत आहे. लग्नांच्या हंगामासोबतच अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील मोठी स्वप्ने पूर्ण करताना दिसत आहेत. अशाच एका प्रेरणादायी गोष्टीची बातमी आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री वनिता खरातची. वनिता ही एका चाळीच्या खोलीत राहात होती. आता तिने एका मोठ्या बिल्डींगमध्ये 23व्या मजल्यावर घर खरेदी केली आहे. तिच्या घरातील प्रत्येक कोपरा हा अतिशय सुंदर सजवलेला आहे. सध्या सोशल मीडियावर वनिताच्या घराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

वनिताने आपल्या अथक मेहनतीने आणि कमाईच्या बळावर मुंबईत हायफाय टॉवरमध्ये २३व्या मजल्यावर हक्काचं घर खरेदी केलं आहे. बालपण १० बाय १०च्या छोट्या खोलीत (किंवा ताडपत्री घरात) काढलेल्या वनितासाठी ही स्वप्नपूर्ती खूप खास आहे. काही महिन्यांपूर्वी तिने नव्या घराची खरेदी झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने या नव्या घरात विधीपूर्वक गृहप्रवेश केला आहे आणि सोशल मीडियावर त्याची सुंदर झलक शेअर केली. आता इंटिरिअरचे काम पूर्ण केल्यानंतर वनिताने घरातील व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

वनिताने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

वनिताने तिचे घर कसे आहे हे दाखवण्यासाठी संपूर्ण घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओपाहून तिने संपूर्ण घरात मराठमोळा लूक दिला आहे. प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. घराचा हा व्हिडीओ शेअर करत वनिताने, घर घेतल्यावर कदाचित घ्यायच्या आधीच माझं ठरलं होत की माझं घर कसं दिसेल कसं असेल, अगदी तसच्या तसं किंबहुना त्याहून खूप सुंदर घर सजवलंस तू विनायक. मी तुझ्या हातात मोकळा “फ्लॅट” दिला होता तू त्याचं प्रचंड सुंदर “घर” तयार केलंस. विनायक तुला प्रचंड घट्ट मिठी आणि आयुष्यभरासाठी प्रेम असे कॅप्शन दिले आहे.

चाहत्यांनी केले कौतुक

वनिताचा हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि कौतुक केले जात आहे. पूर्वी १० बाय १० च्या छोट्याशा खोलीत राहणाऱ्या वनिताने मेहनतीने आणि चिकाटीने हे यश मिळवले आहे. तिची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आता वनिता या नव्या घराचे नवे व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट?
  • T20I WC : चाललंय काय हे? हर्षितनंतर आणखी एक बॉलर स्पर्धेतून आऊट, दुखापतीमुळे 24 तासांत तिघांचा गेम
  • 24 वर्षांमध्ये ‘या’ दिग्दर्शकाने दिला नाही एकही सुपरहिट, तरीही जिंकले 4 नॅशनल अवॉर्ड
  • India-US Trade Deal : भारतासाठी मोठी GOOD NEWS, अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी मारलं, काश्मीरचा संदर्भ
  • किडनीचा प्रत्येक आजार होईल बरा, बाबा रामदेव यांनी सांगितले हे प्रभावी घरगुती उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in