• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vande Bharat Food : वंदे भारत ट्रेनमधील जेवणामुळे थेट ओठच सुजले? महिलेने फोटो पोस्ट केल्याने खळबळ!

April 1, 2026 by admin Leave a Comment


Vande Bharat Train Food Quality : देशातील प्रीमियम ट्रेन म्हणून ओळख असलेली वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या रेल्वेत दिल्या जाणाऱ्या अन्नामुळे एका माझी प्रकृती बिघडली तसेच माझ्या मुलगाही आजारी पडला, असा दावा या महिलेने केला आहे. या महिलेने सोशल मीडियावर सुजलेल्या ओठांसह आपला फोटो अपलोड केला आहे. त्यामुळे देशभरात वंदे भारत रेल्वेत दिल्या जाणाऱ्या अन्नाविषयी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या महिलेने केलेल्या दाव्यानंतर आयआरसीटीसीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेनमधील जेवण खाल्ल्याने प्रकृती बिघडल्याचा दावा करणाऱ्या महिलेचे नाव आयुषी असे आहे. ही महिला 27 मार्च रोजी 22500 या क्रमांकाच्या ट्रेनमध्ये E1 या डब्यात आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होती. यावेळी या महिलेने रेल्वेत दिले जाणारे अन्न खाल्ले. त्यानंतर मला अॅलर्जी झाली आणि माझे ओठ खूप सुजले, असा दावा या महिलेने केला आहे. सोबतच माझ्या मुलालाही जुलाब झाले, असेही या महिलेने म्हटले आहे. या महिलेने रेल्वेत पिण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मी वेळेवर रुग्णालयात गेली नसते, तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती, असं या महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

@IRCTCofficial @RailwaySeva @RailMinIndia @K44869654Kumar Worst quality food provided on vande bharat express and insensitive attitude of staff towards complaints. This is my medical prescription describing severe allergy after consuming food in Vande Bharat 22500. pic.twitter.com/ddfg2mMUC9

— The_Mediocre_Fille (@AyushiS54377868) March 31, 2026

IRCTC ने घेतली दखल, चौकशी होणार

दुसरीकडे महिलेने केलेल्या या दाव्याची आयआरसीटीसीने दखल घेतली आहे. या तक्रारीनंतर आम्ही ट्रेनमधील अन्नाची चाणी केली. ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता चांगली होती. सोबतच त्या रेल्वेत प्रवास करणाऱ्या अन्य कोणत्याही प्रवाशाने अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार केलेली नाही, असे आयआरसीटीसीने सांगितले आहे. IRCTC ने संबंधित महिलेकडे या प्रकरणाची अधिक माहिती मागवली आहे. तसेच आम्ही या प्रकरणी सखोल चौकशी आणि तपास करू, असेही आश्वासन IRCTC ने दिले आहे. दरम्यान, याआधीही वंदे भारत रेल्वेत दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी केलेल्या आहेत. आता ही नवी तक्रार आल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in