• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Suryavanshi : 4 चौकार-4 षटकार, वैभव सूर्यवंशीचं वादळी अर्धशतक, वर्ल्ड कप स्पर्धेत तडाखा कायम

January 27, 2026 by admin Leave a Comment


अंडर 19 टीम इंडियाचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वर्ल्ड कप स्पर्धेत आपला तडाखा कायम ठेवला आहे. वैभवने सुपर 6 फेरीतील सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध तडाखेदार खेळी करत अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने नेहमीप्रमाणे मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 24 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने या अर्धशतकी खेळीतील 50 पैकी 40 धावा या अवघ्या 8 चेंडूत केल्या. वैभवने अर्धशतकी खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. वैभवने 208 पेक्षा जास्त स्ट्राईक रेने ही खेळी केली. वैभवची या स्पर्धेत 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ ठरली. वैभवने त्याआधी बांगलादेश विरुद्ध 72 धावांची खेळी केली होती.

वैभवसोबत पंगा महागात

वैभवला या खेळीदरम्यान झिंबाब्वेच्या एका गोलंदाजाने डोखे दाखवले. मात्र वैभवला डोळे दाखवणं झिंबाब्वेच्या गोलंदाजाला चांगलंच महागात पडलं. वैभवने त्याला डोळे दाखवणाऱ्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली आणि धावा मिळवल्या.

नक्की काय झालं?

झिंबाब्वेचा गोलंदाज पनाशे मजाई याने पाचव्या ओव्हरदरम्यान वैभवला जोखे दाखवले. वैभवने मजाईच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिक्स लगावला. वैभवने त्याच्या बॉलिंगवर सिक्स मारल्याने मजाई बावचाळला. मजाईने वैभवकडे रागात पाहत डोळे दाखवले. मात्र वैभवने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. मात्र वैभवने झिंबाब्वेच्या या गोलंदाजांचा बॅटिंगने हिशोब केला आणि मस्ती जिरवली.

वैभवने मजाईच्या पुढील षटकात षटकार-चौकार लगावला. वैभवने त्यानंतर नवव्या ओव्हरमध्ये चौकार लगावला. तसेच वैभवने नवव्या ओव्हरमध्ये 1 फोर लगावला. तसेच 1 धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं.

वैभवच्या खेळीचा 52 धावांवर शेवट

दरम्यान वैभव वादळी अर्धशतकानंतर काही मिनिटांनी आऊट झाला. वैभवने या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र वैभव अर्धशतकानंतर 2 धावा जोडून झाल्यानंतर आऊट झाला. वैभवने 30 बॉलमध्ये 52 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य
  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in