• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Suryavanshi : 15 चौकार-15 षटकार, वैभव सूर्यवंशीची 175 धावांची ऐतिहासिक खेळी, फायनलमध्ये 5 वर्ल्ड रेकॉर्ड्स

February 8, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 टीम इंडियाचा स्टार आणि ओपनर बॅट्समन वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध विक्रमी आणि चाबूक बॅटिंग केली. वैभवने या सामन्यात संयमी सुरुवात करत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर वैभवने गिअर बदलत पाहता पाहता शतक आणि दीडशतक केलं. त्यामुळे वैभवकडे द्विशतक करण्याची संधी होती. मात्र वैभवचं द्विशतक अवघ्या 25 धावांनी हुकलं. वैभव 175 धावांवर बाद झाला. मात्र वैभवने या खेळीसह तब्बल 5 वर्ल्ड रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. वैभवने नक्की काय काय विक्रम केले? हे जाणून घेऊयात.

कॅप्टन आयुष म्हात्रे याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. वैभव आणि ॲरॉन जॉर्ज ही सलामी जोडी मैदानात आली. जॉर्ज झटपट आऊट झाला. त्यानंतर वैभवने आयुषसह भारताचा डाव सावरला. या दोघांनी स्फोटक बॅटिंग केली. वैभवने या दरम्यान 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर 55 चेंडूत शतक झळकावलं. वैभवने 72 बॉलमध्ये दीडशतक पूर्ण केलं. त्यामुळे वैभव सहज द्विशतक करेल, असं चित्र होतं. मात्र वैभव दीडशतकानंतर आणखी काही धावा जोडून आऊट झाला. वैभवने 80 बॉलमध्ये 15 सिक्स आणि 15 फोरसह 80 बॉलमध्ये एकूण 175 रन्स केल्या. वैभवने 218.75 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.

वैभव तिसरा भारतीय

वैभव अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात शतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. वैभवआधी उनमुक्त चंद आणि मनजोत कालरा या दोघांनी शतक झळकावलेलं. मात्र वैभवने दोघांच्या तुलनेत वेगवान शतक झळकावलं.

वैभवचे 5 वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड्स

  1. वैभव सूर्यवंशी याने आयपीएलनंतर अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ऐतिहासिक कामगिरी केली. वैभव अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला.
  2. वैभव सूर्यवंशी याने 55 चेंडूत शतक पूर्ण केलं. वैभव यासह अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला.
  3. वैभव अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला.
  4. वैभवने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज हा बहुमान मिळवला.
  5. वैभवने या खेळीसह षटकारांचं शतकही पूर्ण केलं. वैभव अंडर 19 वनडे क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ayush Mhatre : कॅप्टन आयुषने ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयानंतर सांगितला फ्यूचर प्लान, म्हणाला, आता…
  • 100 पेक्षा अधिक चित्रपटात केलं काम, पण 13 वर्षांमध्ये दिला एकही हिट, संपत्ती पाहून उडतील होश
  • ज्याची भीती होती तेच घडलं; दोन शक्तीशाली देश थेट आमने -सामने, भारताशी कनेक्शन, तणाव वाढला
  • पोटदुखीच्या समस्या आरोग्याकडे दुर्लक्ष, होऊ शकतात गंभीर आजार……
  • ENG vs NEP : हलक्यात घ्यायचं काम नाय, हरले पण रडवून सोडलं, इंग्लंडचा नेपाळ विरुद्ध 4 धावांनी विजय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in