
Vaibhav Suryavanshi: मंगळवारी वैभव सूर्यवंशीने मुंबई इंडियन्सला लोळवले. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या आणि दीपक चाहर सारख्या दिग्गज गोलंदाजाचा त्याने खणखणीत समाचार घेतला. या दमदार गोलंदाजांना त्याने फोडून काढले. तो या दिग्गज गोलंदाजाला पुरून उरला. वैभव थोडाही घाबरला नाही. त्याने बुमराह याला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्या या खेळीने भल्याभल्या गोलंदाजान घाम फोडला. वैभवने त्याच्या चाहत्यासाठी खास 4 शब्दांची प्रतिक्रिया दिली. तो संदेश आता चर्चेत आला आहे.
बुमराह तर पाहतच राहिला
पहिल्याच चेंडूवर त्याने बुमराह याला षटकार झोडला. त्याच्या या कृतीने फॅन्ससह सर्वच जण अचंबित झाले. लाँग ऑनवर त्याने खतरनाक पद्धतीने षटकार टोलावला. वैभवने त्याच्या दमदार खेळीनंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने केवळ 4 शब्दांमध्ये मनातील भावना व्यक्त केल्या. हंगामातील तिसऱ्या डावात वैभव सूर्यवंशी याने केवळ 14 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांसह 40 धावा केल्या. त्याने सलामीला उतरत यशस्वी जायसवाल याच्यासोबत 5 षटकामध्ये 80 धावा चोपल्या. शार्दुल ठाकूर याच्या चेंडूवर त्याने फटका मारला पण तिलक वर्माने तो टिपला. वैभवचा झेल त्याने पकडला. तर त्या षटकात त्याने बाद होण्यापूर्वी 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता.
View this post on Instagram
या दोघांच्या दमदार खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यात 11 षटकात 2 गडी बाद 150 धावा केल्या. तर 151 धावांचे उद्दिष्ट समोर असताना लक्ष्याचा धावा करताना मुंबई इंडियन्स संघ 9 गडी बाद 123 धावांवर बाद झाला.
राजस्थान रॉयल्सने या हंगामात सलग तिसरा विजय मिळवला आहे. या संघाने 6 गुण खात्यात जोडले आहेत. गुणतालिकेत हा संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. रॉयल्सच्या विजयानंतर वैभव सूर्यवंशीने सोशल मीडियावर या सामन्यातील काही छायाचित्र शेअर केली आहेत. या इन्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्याने त्याच्या फलंदाजीचा अंदाज सादर केला. संघासोबतचे छायाचित्रही शेअर केले. त्याने इन्स्टाग्रामवर एक खास संदेश लिहिला. 15 वर्षांच्या वैभव याने सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘तुमच्या पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद.’
Leave a Reply