• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

USA : युद्ध सुरू असतानाच अमेरिकेला धक्का, दूतावासावर आदळलं मिसाईल, ज्वाळा, धुराचे लोट आणि…

March 14, 2026 by admin Leave a Comment


आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धामुळे बराच विध्वंस झाला आहे. इराणवर अमेरिका-इस्रायल तुटून पडलेत, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. याच दरम्यान आता अमेरिकेला मोठा दणका बसला आहे. कारण बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावर मिसाईल हल्ला झाला असून, हेलिपॅडलाच टार्गेट करण्यात आलं आहे. या मिसाईल हल्ल्यानंतर चहूबाजूंनी आगीच्या ज्वाळा उठल्या आणि धुराने संपूर्ण परिसर माखून गेला. वाढत्या तणावादरम्यान आणि अलिकडच्या काळात आलेल्या धमक्यांदरम्यानच हा हल्ला झाला आहे.

इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील “ग्रीन झोन” या सर्वात सुरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या अमेरिकन दूतावासावर मोठा हल्ला झाला आहे. इराकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दूतावासाच्या आवारातील हेलिपॅडला लक्ष्य करून मिसाईल डागण्यात आलं. या हल्ल्यानंतर लगेचच दूतावासाच्या आवारातून प्रचंड धूर निघाला, या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. अमेरिकन दूतावासातील रडार सिस्टमला आत्मघाती ड्रोनने लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये अमेरिकन दूतावासाच्या आवारातून धुराचे लोट उठताना स्पष्ट दिसत आहेत. मात्र दूतावासावरील या हल्ल्यात कोणतेही नुकसान अथवा जीवतहानी झाल्याची पुष्टी अमेरिकेने अद्याप केलेली नाही. हल्ल्यानंतर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

बातमी अपडेट होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याणमध्ये तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह
  • तीन दिवसानंतर थेट खातं बंद, पैसेच काढता येणार नाही, तुमचं तर या बँकेत खातं नाही ना?
  • युझवेंद्र चहलने ते व्हिडीओ पाठवत मेसेज केला; ‘गंदी बात’ अभिनेत्रीने सर्वांसमोर चॅटच दाखवले
  • MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन सुरु होण्याआधीच मोठा पराक्रम, अवघ्या 3 तासात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in