• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US Tariff On India : टॅरिफ बद्दलचा अमेरिकेचा भारताबाबतचा निर्णय हा पाकिस्तान, बांग्लादेशसाठी झटका, नक्कीच त्यांना मिर्च्या झोंबतील, कारण…

February 3, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेसोबत दीर्घकाळापासून सुरु असलेल्या ट्रेड डीलशी संबंधित मोठी अपडेट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: याबद्दल संकेत दिले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवर चर्चा केली. त्यानंतर संपूर्ण ट्रेडच समीकरण बदललं. अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ आणि 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लावला होता. म्हणजे एकूण टॅरिफ 50 टक्के होतो. आता त्याच अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करुन टॅरिफ 18 टक्क्यावर आणला आहे. हा टॅरिफ चीन, पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या तुलनेत कमी आहे. ट्रम्प यांची टॅरिफ चाल समजून घेऊया तसच अन्य देशांवर लागणाऱ्या टॅरिफ बद्दलही जाणून घ्या.

अमेरिकेतून ट्रेड आणि टॅरिफ बद्दल आलेली ही बातमी मार्केटसाठी चांगली मानली जातेय. देशाच्या ऑटो सेक्टर पासून टेक्सटाइल क्षेत्रासाठी ही चांगली बातमी आहे. सोबतच पुढच्या काही दिवसात अमेरिकेसोबत ट्रेड वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्याच इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की, अमेरिकेने जो टॅरिफ कमी केलाय, तो जगातील इमर्जिंग मार्केटमध्ये दुसऱ्या नंबरवर येतो. याचा अर्थ असा की, इमर्जिंग मार्केटमध्ये दक्षिण कोरियानंतर भारतावरच सर्वात कमी टॅरिफ लागलाय. ट्रेड आणि विकासासाठी हे शानदार संकेत आहे. भारतीय सामानावर आता अमेरिकेत चीन, बांग्लादेश आणि शेजारच्या पाकिस्तानपेक्षा पण कमी टॅरिफ लागेल. याचा फायदा येणाऱ्या दिवसात भारताला मिळेल.

पाकिस्तानवर किती टक्के टॅरिफ?

इमर्जिंग मार्केट्स बद्दल बोलायचं झाल्यास अमेरिकेने सर्वात कमी टॅरिफ दक्षिण कोरियावर लावला आहे. हा टॅरिफ फक्त 15 टक्के आहे. यानंतर भारताचा नंबर येतो, 18 टक्के टॅरिफ. त्यानंतर थायलंड, फिलीपींस, मलेशिया, इंडोनेशिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ब्राझील हे देश येतात. पाकिस्तानवर अमेरिकेने अजूनही 19 टक्के टॅरिफ लावलाय. भारतापेक्षा हा टॅरिफ एक टक्क्याने जास्त आहे. भारतापेक्षा जास्त टॅरिफ बांग्लादेशवरही आहे.

ऑगस्ट महिन्यापासून भारतावर अमेरिकेने हा टॅरिफ लावलाय. भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देणं हा ट्रम्प यांचा यामागे उद्देश होता. पण त्याचा भारतावर फार परिणाम झाला नाही.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या
  • मोठी बातमी! युद्धात मोठं ट्विस्ट, अमेरिका आता थेट इराणमध्ये थेट सैन्य घुसवणार? युद्धात नव्या बलाढ्य देशाची उडी, होणार मोठा खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in