• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US Tariff On India : आता टॅरिफ कमी केलाय, पण अमेरिकेने भारतासमोर ठेवलीय मोठी अट

February 3, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि अमेरिकेमध्ये सोमवारी एक ऐतिहासिक ट्रेड डील झाली. यानंतर व्हाइट हाऊसकडून एक स्टेटमेंट समोर आलय. व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की, भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करेल तेव्हाच व्हाइट हाऊस भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवेल. भारत रशियाकडून तेल खरेदी फक्त कमी करणार नाही, तर पूर्णपणे बंद करेल असा दावा अमेरिकन अधिकाऱ्याने केला. याआधी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेत ट्रेड डील झाल्याची घोषणा केली. अमेरिकेने भारतातून येणाऱ्या सामानावर लावलेला 25 टक्क रेसिप्रोकल टॅरिफ घटवून 18 टक्के केला आहे.

आता अशी सुद्धा चर्चा आहे की, अमेरिका लवकरच भारतावर लावलेला 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ हटवेल. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. भारतातून अमेरिकेत निर्यात होणार्‍या सामानावर 50 टक्के टॅरिफ आहे. आता टॅरिफ 18 टक्के झाला म्हणजे 7 टक्के घट याचा अर्थ 43 टक्के टॅरिफ अजूनही काम आहे. रशियाकडून पूर्णपणे तेल खरेदी थांबवल्यानंतरच टॅरिफ फक्त 18 टक्के राहीलं.

#WATCH | Senior White House official to ANI: U.S. will also drop the 25% additional tariff on Indian imports since India reduced purchases of Russian oil. ‘Yes, although the agreement is that India will cease, not just reduce, Russian oil purchases,” the official confirmed… pic.twitter.com/n4w4PBuhNI

— ANI (@ANI) February 2, 2026

तरच भारतावरील टॅरिफ पूर्णपणे हटवला जाईल

अमेरिका भारतावर लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही लवकरच हटवेल असं व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितलं. भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचललय असा दावा या अधिकाऱ्याने केला. दुसरीकडे या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की, अमेरिकेचा उद्देश फक्त तेल खरेदी कमी करणं नाही, तर भारताला पूर्णपणे रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागेल. अधिकारी म्हणाला की, अशी सहमती झाली तरच अमेरिका भारतावर लावलेला अतिरिक्त टॅरिफ पूर्णपणे हटवेल.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?
  • Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक, ‘तो’ Video पाहून म्हणाल…
  • जेवताना घाम येतोय? कुठल्या गंभीर आजाराचे लक्षण आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं वाचा…
  • Praful Patel: दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनि‍करण? प्रफुल पटेल यांचा मोठा बॉम्ब, राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठे वक्तव्य काय?
  • Praful Patel : पवार कुटुंबात किती दिवसाचा दुखवटा असतो? प्रफुल्ल पटेलांनी काय उत्तर दिलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in