• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US Israel Iran War: ‘ पंतप्रधान मोदींच्या एका कॉलने थांबू शकतं युद्ध..’, ईराण-इस्त्रायल युद्धादरम्यान माजी राजदूताचं मोठं विधान

March 10, 2026 by admin Leave a Comment


गेल्या 10-11 दिवसांपासून इराण-इस्त्रायलमध्ये प्रचंड तणाव असून युद्धसंघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला. त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, इराणमध्ये प्रचंड विध्वंस झाला. यामुळे भडकलेल्या इराणने अणेरिका-इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आणि संघर्ष आणखीनच भडकला. दोघांपैकी कोणीच हार मानायला तयार नाही, मात्र या युद्धाचे चटके फक्त या तीन देशांनाच नव्हे तर संपूर्ण जगालाही बसत आहे. आखाती देशांसह, अगदी भारतपर्यंत युद्धाची झळ पोहोचली आहे. ईराण-इस्त्रायल युद्धात दोन्हींकडून एकमेकांवर मिसाईल्स, ड्रोनचा मारा केला जात आहे. इमारती उद्ध्व्सत, लोकांचे बळी जात आहेत. याचा परिणा संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. त्यातच इराणने न झुकण्याची भूमिका घेतल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रमप आणखीनच संतापले आहेत. त्यांनी अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याला इराणचा सर्वोच्च नेता मानण्यासही नकार दिलाय.

इराण आणि अमेरिका युद्ध अधिक घातक होत चालले असून मध्य पूर्वेतील संघर्षाने रौद्र रूप धारण केलं आहे. मात्र याच दरम्यान आता संयुक्त अरब अमिराती देशाचे माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी भारताच्या मध्यस्थीबद्दल मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कॉल केल्यास, इराण-इस्रायलमधील हा संघर्षण थांबवण्यास मदत होऊ शकतं, असं महत्वाचं विधान त्यांनी केलं.

मोदींचा एक कॉल पुरेसा

हुसैन हसन मिर्झा हे संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील पहिले उच्चायुक्त. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भारताच्या राजनैतिक भूमिकेबद्दल आणि पंतप्रधान मोदींच्या दोन्ही देशांसोबतच्या संबंधांबद्दल भाष्य केले.’ भारत एक महान देश आहे. भारताचं प्रोफाईल… फक्त 1 कॉल… पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा फक्त एक फोन कॉल हा इराण-इस्रायलमधला रक्तरंजित संघर्ष थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी पुरेसा आहे. फक्त 1 फोन…’ असं ते म्हणाले.

एक कॉल आणि संघर्षावर निघू शकतो तोडगा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते आणि इराणशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. 10 दिवसांपूर्वीच मोदी इस्रायलमध्ये होते ना. मिस्टर मोदींचे इराणशी खूप चांगले संबंध आहेत. भारत हा इराणचा सर्वात मोठा तेलाचा खरेदीदार, ग्राहक आहे. त्यामुळे खूप सोप्प आहे. मि.मोदी यांच्या एक कॉलमुळे सगळी समस्या सुटू शकते. संघर्षावर काही तोडगा निघू शकतो, असं विधान यूएईचे माजी उच्चायुक्त मिर्झा यांनी केलं.

भारत राजनैतिक हस्तक्षेप करेल

पुढे हुसेन हसन मिर्झा म्हणाले की, मला आशा आहे की भारत राजनैतिक हस्तक्षेप करेल, कारण युएईमध्ये सुमारे 35 लाख भारतीयांचा मोठा समुदाय आहे. युएईने कधीही त्यांच्या हद्दीतून इराणविरुद्ध कोणत्याही कारवायांना परवानगी दिलेली नाही, असंही त्यांनी पुढे नमूद केलं. कुवेत आणि कतारसारख्या इतर आखाती देशांनीही त्यांच्या भूमीतून इराणविरुद्ध हल्ल्यांना परवानगी दिलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

सोमवारी इस्रायली सैन्याने मध्य इराणवर हल्ले करण्याची एक नवीन लाट सुरू केली, ज्यामध्ये बेरूतमधील हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं , त्यामुळे युद्धातील मृतांची संख्या आणि जीवितहानी वाढतच आहे. इराणच्या संयुक्त राष्ट्रांच्या राजदूताने मृतांची संख्या 1332 असल्याचे सांगितलं. तर हजारो जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे सातव्या अमेरिकन सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याची अमेरिकेकडून पुष्टी करण्यात आली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
  • Pakistan-Saudi Arabia : इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक, फायटर जेट्स सौदी अरेबियात दाखल
  • आशा भोसले यांच्या निधनावर पाकिस्तानी सेलिब्रिटी हळहळले, पोस्ट करत म्हणाले…
  • अरेरे किती ते हाल! अशोक खरातच्या घशा खाली घास उतरेना, बायकोबद्दल विचारताच…
  • Asha Bhosle Movie: गायिकाच नव्हे अभिनेत्रीही, 79 व्या वर्षी केलं डेब्यू; आशा भोसलेंचा हा चित्रपट पाहिलाय का ? डोळ्यांत येईल पाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in