• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US, Iran War : अमेरिका इराणवर घालणार शेवटचा घाव, संतापलेल्या ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय, मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी

March 22, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये गेल्या 22 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भयंकर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं सैन्य मोठ्या प्रमाणात मारलं गेलं आहे. एवढंच नाही तर सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर देखील इस्त्रायलयकडून इराणचे अनेक टॉप कमांडर लक्ष्य करण्यात आले आहेत. त्यामुळे या युद्धात प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराण देखील मागे घेताना दिसत नाहीये, इराणकडून अमेरिकेच्या सैन्य तळांवर मिसाईल हल्ले सुरूच आहेत. तसेच इराणने इस्त्रायलमध्ये देखील हाहाकार उडून दिला आहे. अमेरिकेची सैन्य तळं ज्या -ज्या देशांमध्ये आहेत, त्या -त्या आखाती देशांना देखील इराणकडून लक्ष केलं जात आहे. एवढं होऊन देखील इराण मागे घेत नसल्यानं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

यूएसएस त्रिपोलीनंतर आता अमेरिकेनं आणखी एक मोठी युद्धनौका यूएसएस बॉक्सर मध्य पूर्वेकडे तैनात केली आहे. अमेरिकेच्या या युद्धनौकेवर तब्बल 2200 अमेरिकन मरीन कमांडो आहेत, ज्यांचा उद्देश हा इराणच्या खर्ग आयसलँडवर ताबा मिळवणे हा असू शकतो. तर दुसरीकडे यूएसएस त्रिपोली ही देखील एक विशालकाय युद्धनौका आहे, हिचा देखील उद्देश हा इराणमध्ये आपल्या सैन्यांचा प्रवेश हा असू शकतो. मात्र तरी देखील असा प्रश्न आता उपस्थित होत आहे की? सध्या हे युद्ध फक्त समुद्रात सुरू आहे. अमेरिकेच्या या युद्धा नौका इराणच्या समृद्र किनाऱ्यांवर जाण्याची हिमंत दाखवतील का? असा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. कारण जर या युद्ध नौका इराणच्या समुद्र किनाऱ्यावर गेल्या तर इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे अमेरिकेचं मोठं नुकसान होऊ शकतं.

त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, अमेरिकेने एका पाठोपाठ आपल्या काही युद्ध नौका या इराणकडे पाठवल्या आहेत. मात्र अमेरिका आपलं सैन्य प्रत्यक्षपणे इराणच्या भूमीवर कसं उतरवणार? किंवा दुसरीकडे अमेरिका खर्ग आयसलँडवर तरी कसं पोहोचणार? अमेरिकेच्या या मोहिमेमध्ये त्यांना अजून एखादा देश गुप्तपणे मदत करत आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे. या युद्धनौका रवाना करण्यापूर्वी अमेरिकन प्रशासनानं मोठं विधान केलं आहे, हा इराणवर शेवटचा हल्ला असणार आहे, दरम्यान जर अमेरिकेनं इराणचं खर्ग आयसलँडवर ताब्यात घेतलं तर हा अमेरिकेचा सर्वात मोठा विजय ठरणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानचा वाईट काळ सुरु, इस्लामाबादवर कोसळणार मिसाइल्स?
  • 20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका
  • पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत भाजपकडून मित्रांचीच शिकार… रोहित पवारांनी दिली पक्की बातमी, म्हणाले
  • Maharashtra News LIVE : बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग, सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार
  • 19 व्या वर्षी कशी दिसायची जीनत अमान, 70 च्या दशकातील अभिनेत्रीचे 15 बोल्ड फोटो व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in