• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US-Iran Tension : टार्गेट सेट, स्पेशल कमांडो युनिट्स कुठून घुसतील? सर्वातआधी अमेरिका इराणमधल्या या पाच ठिकाणांवर पहिला हल्ला करेल, कारण…

January 31, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेने इराणवर हल्ल्याचं टार्गेट सेट केलं आहे. यासाठी इराणच्या आसपास विमानवाहू युद्धनौका आणि फायटर जेट्स तैनात केले आहेत. इराणची सत्ता इतकी कमकुवत करायची की, सर्वसामान्यांसाठी लोकशाहीचे दरवाजे उघडतील असा अमेरिकेचा प्रयत्न आहे. CIA ने नुकत्याच दिलेल्या अहवालानंतर इराणवरील हल्ल्याचं हे टार्गेट सेट करण्यात आलं आहे. इराणचं सरकार सद्य स्थितीत खूप कमकुवत झालय असं सीआयएन आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना जो रिपोर्ट सोपवलाय त्यानुसार हल्ल्यासाठी 6 सल्ले देण्यात आले आहेत. सर्वप्रथम इराणच्या त्या ठिकाणांवर हल्ला करा, जिथून सर्व शासन संचालित होतं, हा पहिला सल्ला आहे.

1 इराणमध्ये सैन्याचा कारभार खतम अल अनबिया येथून संचालित होतो. जून 2025 मध्ये इस्रायलने सर्वप्रथम येथेच हल्ला केला होता. त्यामुळेच इराणला आपलं ऑपरेशन सुरु करण्यासाठी भरपूर वेळ लागलेला. यावेळी अमेरिकेच्या रडारवर सर्वप्रथम खतम अल अनबिया आहे.

2 अमेरिकेला माहितीय की, इराणमध्ये IRGC चं पतन केल्याशिवाय तिथे सरकार पाडता येणार नाही. अशावेळी अमेरिकेच्या रडारवर IRGC चं मुख्यालय सुद्धा आहे. तेहरामध्ये हे हेडक्वार्टर आहे. थारुल्लाह मुख्यालय असं याचं नाव आहे. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डवर आतापर्यंत 34 देशांनी प्रतिबंध घातलेत.

3 अमेरिकेच्या रडारवर तेहरानपासून काही अंतरावर असलेलं कर्मनशाह सुद्धा आहे. इथे आयआरजीसीने मिसाइलचा बेस बनवून ठेवलेला आहे. इराणच्या बहुतांश धोकादाय मिसाइल्सना येथेच ठेवण्यात आलं आहे. इथे हल्ला करुन इराणचं कंबरड मोडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल.

4 इराणची सत्ता सुप्रीम लीडरकडे आहे. इराणमध्ये शासन संपवायचं असेल, तर त्याला मारणं आवश्यक आहे. सध्या अमेरिकेपासून असलेला धोका लक्षात घेऊन अयातुल्ला खामेनेई अंडरग्राऊंड झालेत. सुप्रीम लीडरच्या कार्यालयातील कामकाज खामेनेईचा लहान मुलगा पाहतोय. इथे सुद्धा अमेरिका हल्ला करु शकते.

5  टेलीग्राफ ब्रिटेननुसार अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला करण्याचा अमेरिकेचा पहिला प्रयत्न असेल. यासाठी अमेरिकेने अजरबैजान येथे दोन कमांडों टीम्सही तैनात केल्या आहेत. मागच्यावेळी अजरबैजान मार्गे इस्रायलने पहिला हल्ला केला होता.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता 12 दिवसांनी सगळं…दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर बड्या नेत्याचं मोठं विधान; राजकारणात खळबळ!
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंडला मिळाली संधी, झालं असं की…
  • राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
  • प्रसिद्ध अभिनेत्रीची इस्लाममधून हकालपट्टी, या धर्मात जाणार; नवं नाव काय? अभिनेत्री काय म्हणाली?
  • डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला अत्यंत मोठी ऑफर, तेलाचं राजकारण ढवळून निघणार, थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in