• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US Iran Ceasefire : सीजफायरमुळे सगळं जग खुश पण अमेरिकेत बसलेला एक माणूस या निर्णयामुळे खूप दु:खी, ती व्यक्ती ट्रम्प नाही

April 8, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये सीजफायर झाल्याने सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला. सध्या दोन आठवड्यांसाठी झालेला हा सीजफायर पुढेही कायम रहावा अशी सगळ्या जगाची इच्छा आहे. कारण या युद्धाने तेल संकटाची गंभीर स्थिती निर्माण केली होती. त्यामुळे सीजफायरच्या घोषणेने सर्वसामान्य आनंदात आहेत. एलपीजी, तेलाचं संकट यामुळे मिटणार आहे. पण अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्याचं स्वप्न धुळीस मिळालय. हा माणूस आहे अमेरिकेत निर्वासित म्हणून राहणारा इराणचा क्राऊन प्रिन्स रजा पहलवी. या युद्धविरामाचं सर्वात जास्त दु:ख त्यांना झालं असणार. या युद्धामुळे इराणमध्ये सत्ता बदल होईल व आपल्याला सत्तेची गादी मिळेल असं त्यांना वाटलं होतं. पण रजा पहलवी यांचा सर्वात मोठा भ्रमनिरास झाला आहे.

रजा पहलवी यांनी सुरुवातीपासून खामेनेई शासनाला विरोध केला आहे. इराणमध्ये लोकशाही येणार असेल तर आपण नेतृ्त्व करायला तयार आहोत. इराणला अमेरिकेचा रणनितीक सहकारी बनवायचं आहे हे युद्ध सुरु असतानाच रजा पहलवी यांनी स्पष्ट केलं होतं. रजा पहलवी आता इराणमध्ये येणार. खामेनेई यांचा खात्मा झालाय. पहलवी गादीवर बसणार असं त्यांची स्टेटमेंट ऐकून वाटायचं. ट्रम्प ज्या प्रमाणे अमेरिकेला महान राष्ट्र बनवत आहेत, त्याप्रमाणे माझ्या शूर देशवासियानो तुम्ही सुद्धा इराणला महान देश बनवा असं रजा पहलवी यांनी इराणी जनतेला आवाहन केलं होतं.

माझा देश सोडून 47 पेक्षा जास्त वर्ष झाली

सीजफायर आधी रजा पहलवी यांनी एक्सवर एक पोस्ट केलेली. त्यात त्यांनी इराणी सुरक्षा पथकांना आवाहन केलं होतं. त्यांनी आपल्या संदेशातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही या भूमीचे देशभक्त आहात आणि प्रसिद्ध कमांडर्सचे वारस आहात असं पहलवी म्हणालेले. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त सैन्य कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई मारले गेले. त्यावेळी पहलवी म्हणाले की, “मला माझा देश सोडून 47 पेक्षा जास्त वर्ष झाली. जगभरात अनेक लोक त्यांचा फोटो घेऊन फिरत आहेत. त्यांना परत येण्याची विनंती करत आहेत. त्यांना आपला नेता बोलत आहेत”

त्यानंतर पुन्हा कधीच ते इराणला आले नाहीत

धर्माला राज-काजपासून वेगळं करुन स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्यावात असं रजा पहलवी यांचं मत होतं. 1960 साली पहलवी यांचा जन्म झाला. वयाच्या 7 व्या वर्षीच ते सार्वजनिक जीवनात आले. त्यांच्या वडिलांच्या राज्याभिषेकावेळी त्यांना औपचारिकरित्या युवराज घोषित करण्यात आलेलं. वयाच्या 17 व्या वर्षीच ते इराणचे सर्वात कमी वयातील पायलट बनले. त्यानंतर काही वेळातच ते फायटर जेट चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेत निघून गेले. त्यानंतर पुन्हा कधीच ते इराणला परतले नाहीत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?
  • वारंवार होणाऱ्या आर्थिक नुकसानीला कंटाळला आहात? कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी करा हे बदल
  • Vaibhav Suryavanshi: मुंबई इंडियन्सला लोळवले, वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची प्रतिक्रिया तुफान व्हायरल, म्हणाला तरी काय?
  • पाकिस्तानला शाबासकी? इराण-अमेरिका युद्धविरामावर जगभरातील देशांची प्रतिक्रिया काय? भारताने काय म्हटलं?
  • ‘धुरंधर 2’च्या लाटेत 10 कोटी बजेटच्या चित्रपटाचा बोलबाला; 6 दिवसांत कमावला 302% नफा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in