• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

U19 world cup 2026 : U19 वर्ल्ड चँपियन्सवर BCCI मेहरबान, कोट्यवधींचं बक्षीस जाहीर !

February 7, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा पुन्हा एकदा जगाने पाहिला आहे. अंडर-19 क्रिकेटमध्ये जगातला सर्वात यशस्वी संघ असलेली टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड चँपियन बनली आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेमध्ये अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला. यामुळे भारतीय संघाला सलग सहाव्यांदा विक्रमी विजेतेपदाचा मान मिळाला. या अभूतपूर्व यशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIने वैभव सूर्यवंशी सह संघातील तरुण भारतीय खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर केलं आहे. बीसीसीआयकडून टीम इंडियाला तब्बल 7.5 कोटींचा इनाम देण्यात येणार आहे.

ICC कडून एकही पैसा नाही

काल, म्हणजेच शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेच्या हरारे येथे झालेल्या गेलेल्या आयसीसी मेन्स अंडर-19 वर्ल्ड कप 202 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा तब्बल 100 धावांनी पराभव केला. या विजयासह, टीम इंडिया सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्डकप विजेचा ठरली आहे. 2022 साली भारताने या स्पर्धेत इंग्लंडलाच हरवलं होतं. मात्र कालच्या विजयानंतरही भारतीय संघाला, खेळाडूंना ICC कडून काहीच बक्षीस मिळालं नाही आणि ते फक्त मेडल्स घेऊन परतले. आयसीसी ही, अंडर-19 स्तरावर कोणतंही आर्थिक बक्षीस देत नाही, कारण ही स्पर्धा तरुण खेळाडूंचा विकास व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून खेळवली जाते.

BCCI कडून बक्षीसांची उधळण

त्यामुळेच, आयसीसीच्या धोरणानुसार, विजयी भारतीय संघाला बक्षीस दिले नाही. मात्र असं असलं तरीही बीसीसीआयच्या धोरणानुसार, प्रत्येक स्तरावर विश्वविजेत्या संघाचा सन्मान करण्याची परंपरा बीसीसीआयने कायम ठेवली आहे. या स्पर्धेचं जेतेपद मिळताच शनिवारी, म्हणजेच आज ( 7 फेब्रुवारी) BCCI चे सचीव, देवजीत सैकिया यांनी मोठी घोषणा केली. अंडर-19 टीम ला मिळालेलं यश हा संपूर्ण देशासाठी आनंदाचा क्षण आहे, असे सांगत त्यांनी टीमला 7.5 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. अंडर-19 स्तरावर BCCIकडून देण्यात आलेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस (रक्कम) आहे. यापूर्वी 2025 मध्ये डर-19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या महिला संघाला बीसीसीायने 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले होते.

कालच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताने प्रथम फलंदाजी करत 411 धावा केल्या. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने टीम इंडियाला ही धावसंख्या रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण स्पर्धेत तीन वेळा शतक हुकलेल्या वैभवने कालच्या सर्वात मोठ्या सामन्यात आपले कौशल्य दाखवले. या सलामीवीराने केवळ 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांसह 175 धावांची आश्चर्यकारक आणि विक्रमी खेळी केली. मात्र एवढी मोठी धावसंख्या ही इंग्लंडसाठी खूप आव्हानात्मक ठरली. कॅलेब फॉकनरच्या शतकानंतरही इंग्लंडा संघ फक्त 311 धावांपर्यंत पोहोचू शकला. या संपूर्ण स्पर्धेत 439 धावा केल्याबद्दल वैभवला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in