• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

U19 World Cup 2026: एकही सामना न जिंकता सुपर 6 मध्ये, टीमला लॉटरी, आता पाकिस्तान विरुद्ध लढत

January 25, 2026 by admin Leave a Comment

भारतात आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्याआधी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 टीम वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारताने या स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने या विजयासह पुढील फेरीत धडक दिली आहे. या स्पर्धेत अनेक संघांनी कामगिरीच्या जोरावर सुपर 6 फेरीत धडक दिलीय. तर एका संघाला एकही सामना न जिंकता पुढील फेरीचं तिकीट मिळालंय. न्यूझीलंडला अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 6 फेरीचं तिकीट मिळालंय.

अंडर 19 न्यूझीलंड टीमने वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत 3 सामने खेळले. न्यूझीलंडला या 3 पैकी एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात करता आली नाही. त्यानंतरही न्यूझीलंडला पुढील फेरीचं तिकीट मिळालंय.

न्यूझीलंडची कामगिरी

न्यूझीलंडचा या मोहिमेतील पहिला सामना यूएसए विरुद्ध होता. मात्र 18 जानेवारीला झालेला हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला.

त्यानंतर न्यूझीलंडचा स्पर्धेतील दुसरा सामनाही पावसामुळे वाया गेला. बांगलादेश-न्यूझीलंड सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. तर न्यूझीलंडला या मोहिमेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. मात्र साखळी फेरीतील 3 सामन्यानंत यूएसएच्या तुलनेत न्यूझीलंडच्या खात्यात 1 गूण जास्त होता. त्यामुळे न्यूझीलंडला सुपर 6 चं तिकीट मिळालं.

सुपर 6 चा मार्ग

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी 16 संघांची विभागणी 4-4 नुसार 4 गटात करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक गटातील अव्वल 3 संघ सुपर 6 साठी पात्र ठरणार आहेत. न्यूझीलंडला त्याचाच फायदा झाला. यूएसएच्या तुलनेत न्यूझीलंडकडे 1 गुण जास्त असल्याने त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. तसेच या ग्रुपमधून भारत आणि बांगलादेशनेही सुपर 6 मध्ये धडक दिलीय.

न्यूझीलंडसमोर पाकिस्तानचं आव्हान

दरम्यान न्यूझीलंडसमोर सुपर 6 मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना हा 27 जानेवारीला होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, घोषणा होताच अमेरिकेत भूकंप, ट्रम्प यांच्या स्वप्नांचा चुराडा?
  • एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिवसेनेतील मोठ्या नेत्याची दांडी, नाराजीची चर्चा
  • Pankaja Munde: तो एक निर्णय आणि पंकजा मुंडेंविरोधात गावकरी आक्रमक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाण्यास मज्जाव, घडलं तरी काय? 
  • ऐश्वर्या रायने रक्त सांडलं… शाहरुख खान दारू प्यायला… माधुरी दीक्षितबद्दल तर नको त्या अफवा… कोणालाच माहिती नसलेलं मोठं रहस्य
  • सर्वात मोठा सेल….या फोनवर मिळतेय प्रचंड सूट, फीचर्स आणि बॅटरी पाहून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in