• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

U19 WC 2026 : उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला नमवत भारताने रचले इतके सारे विक्रम, जाणून घ्या

February 4, 2026 by admin Leave a Comment


अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने हे लक्ष्य 41.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. अंतिम फेरीत धडक भारताने काही विक्रम रचले आहे. भारताने 311 धावांचा पाठलाग करत अंडर 19 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 2002 मध्ये 304 धावांचा पाठलाग केला होता. दरम्यान भारताने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम दहाव्यांदा एन्ट्री मारली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. त्यांनी सहावेळा अशी कामगिरी केली आहे. (Photo-BCCI Twitter)

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वैभव सूर्यवंशी संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये डेवॉर्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक 18 षटकार मारले होते. जॅक बर्नहॅमने 2016 मध्ये 15 षटकार मारले होते. आता वैभव सूर्यवंशीने 2026 मध्ये या विक्रमाची बरोबरी केली आहे. अंतिम सामन्यात 4 षटकार मारताच टॉपला विराजमान होईल. (Photo-BCCI Twitter)

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 311 धावा गाठल्या. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. त्यांनी 2006 मध्ये 305 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. (Photo-BCCI Twitter)

अंडर 19 वनडे क्रिकेटमधील दोन्ही संघांच्या धावांची बेरीज करता दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारत आणि अफगाणिस्तान सामन्यात दोघांच्या मिळून 621 धावा झाल्या. हा विक्रम ऑस्ट्रेलिया आयर्लंड संघाच्या नावावर आहे. या संघांनी एकत्रित 2004 साली 631 धावा केल्या होत्या. (Photo-BCCI Twitter)

अंडर 19 वनडे वर्ल्डकप सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये पहिल्या तीन विकेटसाठी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ होती. (Photo-BCCI Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान समालोचन का करत नाही? स्वत:च सांगितलं कारण…
  • IND vs SA : सूर्यासेनाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी धुव्वा
  • बेलाच्या पानांचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
  • 50 लाखाच्या गृहकर्जामध्ये 20 लाख वाचवा, ‘या’ गोष्टी जाणून घ्या
  • T20 WC 2026 : संजू सॅमसनचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं! सराव सामन्यात झालं असं की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in