• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

U19 AUS vs ENG : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड तगडा सामना, फायनलमध्ये कोण पोहचणार?

February 2, 2026 by admin Leave a Comment

आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडियाने रविवारी 1 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत अंडर 19 आयसीसी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. भारताने यासह उपांत्य फेरीत धडक दिली. भारत यासह उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ ठरला. आता टीम इंडिया, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या 4 संघात एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. आता या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ कोणता असणार? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (U19 Australia vs England) आमनेसामने असणार आहेत. हा सामना मंगळवारी 3 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. ऑलिव्हर पीक ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर थॉमस रेव याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा आहे. उभयसंघातील उपांत्य फेरीतील सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? हे सविस्तर जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना मंगळवारी 3 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना बुलावायोतील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो इथे आयोजित करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला भारतीय वेळेनुसार 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहता येईल.

दोन्ही संघ अजिंक्य, कोण जिंकणार?

दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 3 आणि सुपर 6 मधील 2 असे एकूण 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पैकी कोणता संघ कुणाला सलग सहाव्या विजयापासून रोखून अंतिम फेरीचं तिकीट मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cheapest Liquor : फक्त 35 रुपयांना ब्रँडेड दारू, इथे मिळते सर्वात स्वस्त मद्य!
  • GK : पाकिस्तान नव्हे, भारताची या देशासोबत आहे सर्वात लांब बॉर्डर
  • मुलींशी असं वागणं अत्यंत घृणास्पद आणि…, युजवेंद्र चहल सोबत अफेअरच्या चर्चा, प्रसिद्ध सेलिब्रिटीचा संताप
  • लोणावळा येथे ३९० फूट दरीत कोसळून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू , दहा तासांनी मृतदेह सापडला
  • एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे इंधन स्विच बिघडले, अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली, लंडन ते बंगलुरु फ्लाईट रोखली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in