• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TV9 Satta Sammelan : बाबा रामदेव आणि राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही ? TV9 सत्ता संमेलनात योग गुरूंचं उत्तर काय ?

March 26, 2026 by admin Leave a Comment


TV9 भारतवर्षचं सत्ता संमेलन सुरू असून त्यामध्ये बाबा रामदेव सहभागी झाले होते. यावेळी ते विविध विषयांवर बोलले. या देशात अशी दोन लोकं आहेत ज्यांना थंडी वाजत नाही पहिले तुम्ही आणि दुसरे म्हणजे राहुल गांधी ?  त्यावर रामदेव बाबा म्हणाले की, ‘ मी कॉफी, चहा पीत नाही, ड्रिंकही घेत नाही. ना मी जिममध्ये जातो ना परदेशात. कोणत्याही पद्धतीचे गुप्त संबंध ठेवत नाही. माझं आयुष्य पूर्णपणे खुलं आहे. आतला हीटर कसा चालू करायचा हे मला माहीत आहे. जर खूप थंडी असेल, तर मी योगा करतो. पाच मिनिटांत घाम कसा काढायचा हे मला माहीत आहे. जेव्हा आत (मनात) आनंद असतो, तेव्हा त्रास कशाला करून घ्यायचा, थंडी कशी वाजेल ? सर्व काही शरीर आणि आत्म्यात आहे.’ असं त्यांनी सांगितलं.

पुढे रामदेव बाबा मजेमजेत म्हणाले की राहुल गांधी यांच्यात प्रचंड जोश आहे. राहुल गांधींनी संसदेत गदारोळ माजवला आहे. राहुल गांधींच्या फिटनेसबद्दलही विचारल्यावर योग गुरू म्हणाले की, “जर तुम्हाला दोघांचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं असेल, तर एकमेकांसमोर उभं करा. त्यातून त्यांची युद्धकला आणि कुस्तीमधील निपुणता दिसून येईल. जर एकमेकांना नॉकआऊट करू शकले, तर ताकद स्पष्ट होईल. पण मला एक गोष्ट माहीत आहे, ती म्हणजे, फिटनेस असलाच पाहिजे”.  राहुल गांधी यांच्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे की, त्यांनी आपली शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवावी आणि आपला राजकीय संघर्ष सुरू ठेवावा, कारण लोकशाही ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांच्याही ताकदीवर अवलंबून असते. माझ्या त्यांना शुभेच्छा , असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.

माझ्या कर्तव्यापासून मला कोणीही परावृत्त करू शकत नाही

पुढे बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, मला सांसारिक जीवनातील उलथापालथीची पर्वा नाही. जग जरी माझ्या विरोधात गेलं, तरी कोणीही मला माझ्या कर्तव्यापासून परावृत्त करू शकत नाही. “मतदार नव्हे, तर नेते बना., असं त्यांनी लोकांना सांगितलं. जेव्हा तुम्ही आतून दुर्बळ नसता, तेव्हा तुम्ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त असावे, असं मला वाटतं. दुबळे राहू नका, बलवान बना असं वेदात सांगितलं आहे.
दुबळं रहाल तर जग तुम्हाला मारून टाकेल. जग तुम्हाला तसंही जगू देणार नाही. ज्या जाती, वर्ग, समुदाय आणि राष्ट्रे शक्तिहीन होऊन बळी पडतात, त्यांचा नाश होतो.” असं त्यांनी सांगितलं.

पतंजली जगातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनेल

पतंजलीच्या रशियासोबतच्या कराराबद्दल बाबा रामदेव यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, भारताची तत्त्वं आणि भारतीय उत्पादनं या दोन्हींना परदेशात मागणी आहे. ही मागणी आणखी वाढणार आहे, कारण भारत भांडवलशाही किंवा हुकूमशाहीच्या विचारधारेला मानत नाही. भारत जगाला बाजारपेठ नव्हे, तर आपलं कुटुंब मानतो. त्याच भावनेने, संपूर्ण जग नैसर्गिक औषध आणि अध्यात्माची संकल्पना स्वीकारत आहे. आज आम्ही दावा करतो की, एक दिवस पतंजली जगातील सर्वात मोठा एफएमसीजी (Fast-Moving Consumer Goods) ब्रँड बनेल आणि हे भारतासाठी नक्कीच घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये
  • High Court on EVM: मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM ची तपासणी; मुंबई हायकोर्टाचा आदेश काय?
  • Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in