• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी

April 13, 2026 by admin Leave a Comment


राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थींना बँक KYC अनिवार्य करण्यात आली असताना, याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील एका सेतू सुविधा केंद्र चालकाने एका महिलेच्या घरी जाऊन KYC करून देण्याचे सांगितले. त्यासाठी त्याने संबंधित महिलेची कागदपत्रेही घेतली. मात्र त्यानंतर KYC करून देण्याच्या मोबदल्यात आरोपीने महिलेाकडे अश्लील मागणी करत शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संबंधित महिला हादरली. तिने ही घटना आपल्या पतीला सांगितल्यानंतर पतीने संबंधित व्यक्तीला जाब विचारत दम दिला. तरीही आरोपीने महिलेला त्रास देणे थांबवले नाही. तो वारंवार तिच्या घराबाहेर फेऱ्या मारत असल्याचे समोर आले आहे. अखेर त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC अनिवार्य करण्यात आल्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये घाईचे वातावरण आहे. KYC पूर्ण न केल्यास खात्यातील आर्थिक मदत थांबण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना वाव मिळत असल्याची चर्चा आहे. प्रशासनाने नागरिकांनी अधिकृत केंद्रांवरच KYC प्रक्रिया पूर्ण करावी आणि अशा प्रकारच्या घटनांची त्वरित तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अरेरे किती ते हाल! अशोक खरातच्या घशा खाली घास उतरेना, बायकोबद्दल विचारताच…
  • Asha Bhosle Movie: गायिकाच नव्हे अभिनेत्रीही, 79 व्या वर्षी केलं डेब्यू; आशा भोसलेंचा हा चित्रपट पाहिलाय का ? डोळ्यांत येईल पाणी
  • Sanjay Raut Full Press | एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नेमकं विधान काय?
  • Sanjay Raut | शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; पवारांच्या पोस्टरवरून संजय राऊतांचे विधान चर्चेत
  • Asha Bhosle Video: शाहरुख खान याने आशा ताईंचा उष्टा चहाचा कप उचलेला तेव्हा… पाहत राहिलेला संपूर्ण देश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in