• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Trump warns Iran : इराणने जर असे…केले तर त्यांच्यावर २० पट अधिक हल्ला करु, ट्रम्प यांचा इशारा

March 10, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा शेखी मिरवली आहे. इराणवरील हल्ल्याचे क्रेडिट घेताना ते म्हणाले की दुसऱ्या कोणा प्रेसिडेंटकडे हे करण्याची हिंमत नाही. मला असा अध्यक्ष नको ज्याच्याकडे पाच वर्षे किंवा दहा वर्षातही हिंमत पैदा होत नसेल. ट्रम्प यांनी यावेळी इराणचे नेते मोजतबा खामेनेई यांना धमकावत म्हटले की तो देखील शांत राहू शकतो.

ट्रम्प यांनी आज इराणची फायर, फ्युरी आणि डेथचा इशारा दिला होता. युद्धाच्या ११ व्या दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मोजतबा खामेनेई यांच्या इराणच्या सर्वोच्च पदी नेमल्याने आपण खूश नसल्याचेही म्हटले आहे.
ट्रम्प यांनी हे संकेतही दिले की ते इराणशी थेट बोलू शकतात. फॉक्स न्यूजशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की हे शक्य आहे की मी इराणशी स्वत: बोलेन.ते पुढे म्हणाले की ऑपरेशन एपिक फ्युरीचे निकाल अपेक्षेपेक्षा अधिक जास्त आहे.

सर्वात जास्त आश्चर्य तेव्हा वाटले –

अमेरिकेल्या सैनिक कारवावर इराणने दिलेल्या प्रत्युत्तरा संदर्भात ट्रम्प म्हणाले की इराणचे प्रत्युत्तर पाहून मला आश्चर्य वाटले की त्यांनी त्या देशांवरही हल्ले केले ज्यांनी त्यांच्यावर हल्ले केले नाहीत. ट्रम्प म्हणाले जेव्हा आम्ही त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्यांचे ५० टक्के मिसाईल संपवून टाकले. जर आम्ही असे केले नसते तर हे युद्ध अवघड बनले असते. ट्रम्प यांनी शेखी मारत सांगितले की कोणा अध्यक्षात असे करण्याची हिंमत नव्हती. मी असा कोणताही अध्यक्ष पाहू इच्छित नाही जो पाच वा दहा वर्षात अशी हिंमत दाखवू शकत नाही.

युद्ध संपवण्यावर ट्रम्प यांचा जोर –

इराणशी युद्धाचा कालावधी कमी वेळेचा होऊ शकतो. मात्र युद्धाचा कालावधी वाढू देखील शकतो. मात्र, जर इराणने जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा आणला तर युद्ध वाढू शकते असेही ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी मियामीच्या जवळ आपल्या गोल्फ क्लबमध्ये रिपब्लिकन खासदारांशी बोलताना सांगितले की आम्ही काई वाईट लोकांपासून सुटका मिळवण्यासाठी मध्य पूर्वेत एक छोटी सैर केली होती. आता मला वाटते तुम्ही पाहाल ही एक शॉर्ट सहल होणार आहे. काही तासांनी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की जर इराण असे काही करत असेल ज्याने होर्मुज स्ट्रेटमध्ये तेलाचा फ्लो थांबेल तर अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपेक्षा २० पट मोठा हल्ला करेल.

इराणच्या सरकारी मीडियात प्रसिद्ध झालेल्या ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना इराणच्या IRGC चे प्रवक्ते अली मोहम्मद नॅनी यांनी सांगितले की इराणच आता निश्चित करेल युद्ध कधी संपेल. याच दरम्यान ट्रम्प यांनी जागतिक तेल बाजारातील तेल पुरवठा स्थिर करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दीर्घ चर्चा केली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : होर्मुझच्या सामुद्रधुनीची सीमा किती देशांना लागून आहे? भारतापासून किती दूर?
  • मुंबई : हाय प्रोफाईल पार्टीतील जेवण पडलं महागात, तरूण-तरूणीचा गेला जीव, नेमकं काय घडलं?
  • Infinix Note 60 Pro 5G : आयफोन सारखा रंग ढंग, लाँच झाला ‘प्रो’ फिचर्सवाला जबरदस्त फोन, किंमत किती ?
  • Horoscope : 14 एप्रिल दिवस ठरणार खास, 3 राशीसांठी आला दुर्मिळ योगायोग; वाचा राशीभविष्य
  • IPL 2026 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक बदल, किती सामन्यांवर परिणाम?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in