• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: अरे देवा! सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव…

March 10, 2026 by admin Leave a Comment


मिडल ईस्टमध्ये सध्या अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका, इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण परिस्थिती भयानक झाली आहे. गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून या देशांमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. आज सोन्याचे दर चांगलेच वाढले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर हे सतत वाढताना दिसत आहेत. आज जळगावात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे.

आज १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७२१ रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल १० हजार ३०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर पाहून सर्वसमान्यांना धक्का बसला आहे.

आज १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ६४ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो सुमारे २ लाख ८४ हजार ५८९ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरात गेल्या 10 दिवसांपासून चढ उतार सुरू आहे. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल
  • सोने खरेदीत या दोन पिठुकल्या राष्ट्रांनी देखील मारली बाजी, भरला खजाना, चीनलाही मागे टाकले
  • उन्हाळ्यात बनवा आगळ्या वेगळ्या पद्धतीची आंबट-गोड आंब्याची चटणी, वाचा ही सोपी रेसिपी
  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in