
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम आता भारतातील लहान उद्योगांवरही जाणवत आहे. ठाण्यातील राजमाता फेमस वडापाव विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला देखील याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे रोजच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एका व्यावसायिकाला दररोज 2 ते 3 गॅस सिलेंडर लागतात, मात्र तुटवड्यामुळे आता दिवसाला 1 गॅस सिलेंडर मिळणं देखील कठीण झालं आहे. यामुळे वडापाव तयार करणे आणि विकणे दोन्हीच गुंतागुंतीचे झाले आहे. सिलेंडरचा अभाव आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे वडापावची किंमत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे सध्या सर्वसामान्यांना परवडणारा हा लोकप्रिय स्नॅक भविष्यात महाग होऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे.
Leave a Reply