
Actor Thalapathy Vijay: तामिळ सुपरस्टार थलपती विजय सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचा राजकारणातील प्रवेश आणि शेवटचा सिनेमा म्हणून घोषीत केलेला ‘लोक नेता’ ( जन नायगन ) सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला आहे. त्याच्या चित्रपटाला सेन्सॉरचे सर्टीफिकेट देण्याचे आदेश देणारा एकल न्यायमूर्तींचा आदेश मद्रास हायकोर्टाने २७ जानेवारी रोजी फेटाळला आहे.तसेच हे प्रकरण पुन्हा सिंगल बेंचकडे पाठवले आहे. आता मद्रास हायकोर्टाने आणखी मोठा झटका दिला आहे. त्याला १.५ कोटी रुपयांचा दंड भरण्यास फर्मावले आहे. मात्र, हे प्रकरण चित्रपटाशी संबंधित नसून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी संबंधित आहे.
थलपती विजय याने आयकर विभागाच्या १.५ कोटीचा दंड भरण्याच्या आदेशाला आव्हान देत मद्रास हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळली आहे.इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने वित्तीय वर्षे २०१५-१६ च्या दरम्यान विजयने १५ कोटी रुपयांच्या उत्पनाचा खुलासा केला नव्हता. दंड लावल्यानंतर विजयने हायकोर्टात आव्हान दिले होते, परंतू त्यांना दिलासा मिळाला नाही.
विजयच्या वकीलांची मागणी
विजय याना दंड ठोठावण्याचा आदेश निर्धारित वेळेच्या आत पारित केला होता, त्यामुळे यात हस्तक्षेप करता येणार नाही असे सांगत अभिनेता विजय थलपती याची याचिका न्यायमूर्ती सेंथिलकुमार राममूर्ती यांनी फेटाळली आहे. विजयच्या वतीने वकिलांनी आयकर खात्याच्या आदेशाला आव्हान देत दंडातून सुट देण्याची मागणी केली होती. यावर न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना अपिलीय प्राधिकरणाकडे आदेशाला आव्हान देण्याचा अधिकार आहे असे स्पष्ट केले आहे.
‘पुली’ ची कमाई जाहीर न केल्याचा आरोप
या प्रकरणात २३ जानेवारी रोजी न्यायमूर्तींनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आपला निकाल राखीव ठेवला होता. आता या प्रकरणात निकाल आला आहे.साल २०१५ मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्या दरम्याने जप्त दस्तऐवजाच्या आधारे त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होती की त्यांनी ‘पुली’ चित्रपटाद्वारे झालेली १५ कोटींची कमाई जाहीर केली नव्हती.
Leave a Reply