
राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणात ठाकरे बंधू, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराला सुरुवात केली असून, त्यांनी राज ठाकरेंनी पूर्वी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कारभारावर केलेल्या टीकेचे जुने व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी शेलार यांनी ठाकरे बंधूंना एकत्र येऊन सामोरे येण्याचे आवाहन करत, त्यानंतर “शंभर प्रश्नांची बरसात” करण्याची घोषणा केली होती. यानंतर भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवरून राज ठाकरेंचे जुने व्हिडीओ प्रसिद्ध केले. या व्हिडीओंमध्ये राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर, विशेषतः रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी दरवर्षी ६० कोटी रुपयांच्या खर्चावर आणि बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांचा फोटो दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही या व्हिडीओंमधून करण्यात आला आहे. ही भाजपची उद्धव ठाकरेंना घेरण्याची रणनिती मानली जात आहे.
Leave a Reply