
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसेच्या शाखांना भेटी देऊन प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची घोषणा लवकरच अपेक्षित असून, त्यांनी मराठी आणि मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करणारी खास रणनीती आखली आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा असून, त्यापैकी 41 मुस्लिम बहुल तर 72 मराठी मतदारांचा प्रभाव असलेले वॉर्ड आहेत. जागावाटपाचे सूत्र ठरवताना या दोन्ही घटकांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चांमधून मनसेला सुमारे 60 ते 70 जागा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 140 ते 150 जागा, तर उर्वरित 20 ते 25 जागा मित्रपक्षांना सोडण्याचा विचार आहे. यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही ठाकरे बंधूंना साथ देण्याची शक्यता आहे. भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मुस्लिम मतांसाठी टीका केली आहे. मुंबईचा महापौर मराठीच असेल, असे सांगत भाजपने मोहल्ल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
Leave a Reply