• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Test XI of 2025 : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वर्ष 2025 च्या बेस्ट टेस्ट टीममध्ये 3 भारतीयांना स्थान, कॅप्टन कोण?

December 30, 2025 by admin Leave a Comment


Test XI Cricket Australia : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ष 2025 मधील टेस्ट क्रिकेटमधल्या बेस्ट खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्यांनी टेस्ट टीममध्ये आपल्याच देशाच्या पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ यांना स्थान दिलेलं नाही. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचे मजबूत आधारस्तंभ आहेत. पॅट कमिन्स कॅप्टन आहे. स्टीव्ह स्मिथ दमदार फलंदाज आहे. वर्ष 2025 मध्ये संघाला गरज असताना स्मिथने कर्णधारपदाची जबाबदारी सुद्धा संभाळली. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ष 2025 च्या टेस्ट टीममधून कमिन्स आणि स्मिथ दोघांना बाहेर केलय.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वर्ष 2025 च्या टेस्टच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणारे सर्वाधिक खेळाडू ऑस्ट्रेलियाचेच आहेत. पण यात कमिन्स आणि स्मिथ नाहीय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एकूण त्यांच्या 4 खेळाडूंना 2025 च्या बेस्ट टेस्ट इलेव्हनमध्ये निवडलय. यात मिचेल स्टार्क, ट्रेविस हेड, एलेक्स कॅरी आणि स्कॉट बोलँड सारखे खेळाडू आहेत.

भारताच्या कुठल्या चार खेळाडूंना निवडलं?

ऑस्ट्रेलियन खेळाडूंशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 3 भारतीय खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडलय. भारताकडून केएल राहुल, शुबमन गिल आणि जसप्रती बुमराह यांची निवड केली आहे. त्याशिवाय रवींद्र जाडेजाला टीममधील 12 वा खेळाडू बनवलं आहे.

इंग्लंडचे किती खेळाडू टीममध्ये?

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी 2-2 खेळाडूंना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ष 2025 मधील आपल्या टेस्ट इलेव्हनमध्ये निवडलय. इंग्लंडकडून ज्यो रुट आणि बेन स्टोक्स यांचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून त्यांचा टेस्ट कर्णधार टेम्बा बावुमा त्याशिवाय स्पिनर सायमन हार्मर यांना स्थान मिळालं आहे.

टीमचं कॅप्टन कोण?

टेंबा बावुमाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या टेस्ट टीमचं कॅप्टन बनवलं आहे. केएल राहुल आणि ट्रेविस हेड यांच्यावर ओपनिंगची जबाबदारी दिली आहे. ज्यो रुट 3 नंबरवर तर शुबमन गिल 4 व्या पोजिशनवर फलंदाजीसाठी उतरेल. त्याशिवाय स्टार्क, बुमराह आणि बोलँड यांच्यावर पेस गोलंदाजीची जबाबदारी असेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीममध्ये फक्त एका स्पिनरला संधी दिली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं ठरलं… कधी आणि कुठे होणार लग्न? मोठी अपडेट समोर
  • दुर्मिळ चौसिंगा हरणाला गोळ्या घातल्या…पानशेतच्या रस्त्यावर रक्ताचे सडे; चौघांना अखेर… पोलिसांची मोठी कारवाई
  • IND vs NZ ODI : ऋषभ पंतसोबतच टीम इंडियाच्या या ‘धुरंधरां’चाही पत्ता कट ! 2 स्टार खेळाडू वनडेतून OUT ?
  • Mumbai BMC Polls : ठाकरे बंधू अन् पवारांच्या NCP चा फॉर्म्युला ठरला! मनसे किती जागांवर लढणार तर कोण किती उमेदवार देणार?
  • पापा वहां है, उनके साथ..; धर्मेंद्र यांच्या आठवणीत सनी देओल भावूक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in