• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India : वर्ल्डकप जिंकूनही टीम इंडियाच्या खेळाडूला मिळणार शिक्षा ? फायनलमधील राड्यानंतर कारवाईची टांगती तलवार

March 10, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 च्या (T20 World Cup) फायनलमध्ये न्युझीलंडला हरवून भारतीय संघाने इतिहास रचला. रविवारी ( 8 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने (IND vs NZ) न्युझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवत टी20 वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताच्या खात्यातला हा तिसरा टी20 वर्ल्डकप असून सलग दुसऱ्यांदा त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने यापूर्वी 2007 आणि 2024 मध्येही ही स्पर्धा जिंकट ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. सलग दोनवेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा हा पहिला संघ आहे आणि घरच्या मैदानावर टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

मात्र या विजयानतरही टीम इंडियाचा एक खेळाडू वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असून त्याचं टेन्शन वाढू शकतं, तो म्हणजे भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग. रविवारच्या फानल सामन्यात त्याने केलेल्या एका कृतीमुळे त्याच्यावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. कारण अंतिम सामन्यात, अर्शदीपने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलकडे आक्रमकपणे चेंडू फेकला. तो चेंडू थेट मिशेलच्या खांद्यावर पडला, ज्यामुळे मैदानावर वातावरण चांगलचं तापलेलं दिसलं.

मैदानावरच राडा

अर्शदीपचा बॉल लागल्यावर डॅरिल मिशेल चांगलाच भडकला आणि तो आक्रमक झालेला दिसला. त्याने लगेच अंपायरकडेही तक्रार केली होती. दोन्ही खेळाडूंमधील वाद वाढताना दिसल्यावर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमारयादवने मध्यस्थीसाठी धाव घेतली. त्याने मिशेलला समजावत शांत केलं आणि परिस्थिती हाताळली. तर दुसरीकडे अंपायरकडूनही अर्शदीप सिंगची कानउघडणी करण्यात आली

मात्र आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.9 अंतर्गत अर्शदीप सिंगवर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला जाऊ शकतो. फलंदाज किंवा इतर खेळाडूवर धोकादायक पद्धतीने चेंडू किंवा इतर उपकरणे फेकणे हे खेळाच्या भावनेविरुद्ध मानले जाते असं त्यात म्हटलं आहे.

काय मिळणार शिक्षा ?

अशी प्रकरणे लेव्हल 1अंतर्गत येतात. अर्शदीप सिंगला त्याच्या मॅच फीच्या जास्तीत जास्त 50% दंड आणि त्याच्या खात्यात एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स जोडले जाऊ शकतात. जर एखाद्या खेळाडूने मागील 24 महिन्यांत चार डिमेरिट पॉइंट्स जमा केले तर त्याला एक टेस्ट मॅच किंवा दोन व्हाईट-बॉल मॅचसाठी बंदी घातली जाऊ शकते.

मॅच संपल्यावर मागितली माफी

मात्र मॅचमध्ये हा राडा झाल्यावर ओव्र संपल्यावर अर्शदीपने डेरिल मिशेलची माफी मागितली. तसेच सामना संपल्यावरही त्याने त्याला सॉरी म्हणत हा वाद मिटवला होता. मिशेलनेही त्याची माफी स्वीकारली. मात्र असं असलं तरी आयसीसीकडून या संपूर्ण घटनेची समीक्षा केली जात आहे. टी20 विश्वचषक अंतिम सामन्यातील या वादग्रस्त क्षणाबद्दल अर्शदीप सिंगवर काही कारवाई केली जाणार का, या आयसीसीच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही अशीच एक घटना घडली होती. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सला आयसीसीने त्याच्या मॅच फीच्या 25% दंड ठोठावला होता आणि एक डिमेरिट पॉइंट दिला होता. सील्सने भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल याच्या दिशेने चेंडू फेकला होता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in