• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, विराट-रोहितला मोठा झटका

February 9, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू असताना बीसीसीआयने वार्षिक कराराची घोषणा केली आहे. यात 30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ग्रेड ए मध्ये 3 खेळाडूंचा समावेश केला आहे. बी ग्रेडमध्ये 11 खेळाडूंना स्थान दिलंय. तर सी ग्रेडमध्ये सर्वाधिक 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना धक्का दिला आहे. त्यांची ग्रेड ए मधून गच्छंती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती समोर आली होती. अखेर त्यावर बीसीसीआयने शिक्क्कामोर्तब केलं आहे. ग्रेड ए मध्ये फक्त 3 खेळाडूंना स्थान मिळालं आहे. यात टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचं नाव आहे.

ग्रेड बी मध्ये वॉशिंग्टन सुंदर, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरचा समावेश आहे. तर ग्रेड सी मध्ये अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकु सिंह, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिष्णोई आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.

🚨 News 🚨

BCCI announces Annual Player Retainership for Team India Senior Men and Senior Women for the 2025-26 season#TeamIndia | Details 🔽https://t.co/Rd3pUCPRr9 pic.twitter.com/UNYRThs1kW

— BCCI (@BCCI) February 9, 2026

बीसीसीआयकडून कामगिरीच्या आधारे खेळाडूंना ए, बी, सी आणि डी अशा 4 ग्रेडमध्ये विभागलं जातं. या ग्रेडनुसारच कोणत्या खेळाडूंना वार्षिक किती रक्कम मिळणार हे निश्चित होतं. नियमांनुसार ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना 7, ए मधील क्रिकेटपटूंना 5, बीमधील 3 तर ए मधील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतात.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in