• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?

April 11, 2026 by admin Leave a Comment


Tata Sierra Price: तुम्ही स्वत:ची कार खरेदी करण्याच्या विचारात आहात. मात्र, बजेट कमी असेल तर ईएमआयवर कार खरेदी करण्याची संधी आहे. टाटा मोटर्सची नवीन एसयूव्ही टाटा सिएरा खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला वाटत असेल की कमी पगारात या कारला कसे काय खरेदी करता येईल. जर समजा तुमचा पगार पन्नास हजार महीना असेल तर टाटा सिएरा तुम्हाला नक्की घेता येईल. यावर तुम्हाला किती रुपये ईएमआय पडेल हे पाहूयात…

टाटा सिएराची किंमत किती आणि बेस प्लान काय?

टाटा सिएरा कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत ११.४९ लाख रुपयांपासून सुरु होत टॉप व्हेरिएंट १७.९९ लाख रुपयांपर्यंत जातो. दिल्लीत बेस मॉडेल स्मार्ट प्लसची ऑन रोड किंमत सुमारे १३.३० लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्ही या बेस मॉडेलला खरेदी करण्यासाठी २ लाख रुपये डाऊन पेमेंट भरत असाल तर सुमारे ११.३० लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला घ्यावे लागेल. जर पाच वर्षांसाठीच्या लोनला ८.५ ते १० टक्के व्याजदर पकडला तर तुम्हाला ईएमआय सुमारे २३,००० ते २४,५०० रुपये महिना पडू शकतो. जर याच कर्जाचा कालावधी ३ वर्षांचा ठेवला तर ईएमआय सुमारे ३५,००० रुपयापर्यंत पोहचतो. तर सात वर्षांचा कालावधी पकडला तर ईएमआय घटून १७ ते १८ हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो.

दूसरे व्हेरिएंट किती वाढेल ईएमआय?

जर तुम्ही टाटा सिएराचे आणखी चांगला व्हेरिएंट Pure किंवा डिझेल मॉडेल घ्यायचा विचार करत असाल तर यांची ऑन रोड किंमत १५ ते १७ लाख रुपयांपर्यंत जाते. आणि ईएमआय वाढून ३० ते ३५ हजार रुपये प्रति महिना पोहचतो. टॉप व्हेरिएंटची ऑन रोड किंमत २० लाखाच्या आसपास असून त्यामुळे दोन लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटनंतर पाच वर्षांच्या लोनवर ईएमआय सुमारे ३८ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

५० हजार पगारात कार घेणे योग्य की अयोग्य ?

फायनान्सियल एक्सपर्टनुसार तुमचा ईएमआय तुमच्या इन हँड सॅलरीच्या २० टक्क्यांहून जास्त असायला नको. जर समजा तुमचा पगार ५० हजार आहे तर ईएमआय सुमारे १० हजार रुपयांपर्यंत व्हायला हवा. मात्र, टाटा सिएराचे किमान ईएमआय देखील १७ ते १८ हजारापासून सुरु होतात. त्यामुळे ते तुमच्या पगाराच्या हिशेबाने जास्त आहेत.जर तुमचा पगार ५० हजार आहे आणि कोणतेही मोठे लोन आधीच तुमच्यावर नाही तरीही या एसयुव्हीला खरेदी करणे थोडा दबावाचा निर्णय असू शकतो. ईएमआयला कमी करण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट वाढवावे लागेल. वा स्वस्त कारचा पर्याय स्वीकारावा लागेल.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत
  • घाणेरडी टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक, आत न जाता होईल स्वच्छ, वापरा ही सोपी पद्धत
  • बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
  • आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in