• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20I World Cup 2026 स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, रोहितच्या मित्राला कर्णधारपद, रवींद्रला संधी

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 10 व्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (Icc T20i World Cup 2026) संघ जाहीर करण्याची सध्या लगबग सुरु आहे. संबंधित क्रिकेट बोर्डाकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात येत आहे. बीसीसीआयने सर्वात आधी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आतापर्यंत एक-एक करुन संघ जाहीर केले जात आहेत. आता न्यूझीलंड क्रिकेट संघ (New Zealand Cricket Team) जाहीर करण्यात आला आहे. ब्लॅककॅप्स या एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

रोहित शर्माच्या मित्राला नेतृत्व

क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय न्यूझीलंड संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या मित्राला न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मिचेल सँटनर हा या स्पर्धेत न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. सँटनर आणि रोहित आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळतात. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात फिन एलेन या विस्फोटक सलामीवीर फलंदाजाचं कमबॅक झालं आहे.

वर्ल्ड कपआधी टी 20i मालिकेचा थरार

न्यूझीलंड वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतात टीम इंडिया विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडची वर्ल्ड कपआधी ही शेवटची मालिका असणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी ही मालिका म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेची रंगीत तालिम आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडचा संघ

Ready for India and Sri Lanka 🫡

Your BLACKCAPS squad for next month’s ICC Men’s T20 World Cup 🏆 #T20WorldCup pic.twitter.com/RQGQfDHh7X

— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 6, 2026

न्यूझीलंडचा पहिला सामना केव्हा?

वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. न्यूझीलंडला डी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. न्यूझीलंडसह डी ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि यूएईचा समावेश आहे.

न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचं वेळापत्रक

पहिला सामना, 8 फेब्रुवारी, विरुद्ध अफगाणिस्तान

दुसरा सामना, 10 फेब्रुवारी, विरुद्ध यूएई

तिसरा सामना, 14 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका

चौथा सामना 17 फेब्रुवारी, कॅनडा

टी 20I मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिचेल सँटनर(कर्णधार), ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्यूसन, टीम सायफर्ट, फिन एलेन, जॅक डफी, मॅट हेनरी, रचीन रवींद्र, एडम मिल्न, ईश सोढी, जिमी नीशाम, मार्क चॅपमॅन, डेवन कॉनव्हे, डॅरेल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रोज 300 रुपये वाचवा, मिळवा 15 लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना
  • IPL 2026 स्पर्धेत असं घडणार! वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये ऑल टाइम रेकॉर्ड मोडणार
  • मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी
  • इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
  • मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in