• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20i World Cup 2026 : संजू सॅमसनचा फायनलआधी 7 खेळाडूंविरुद्ध सामना, आयसीसीची घोषणा

March 6, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडला सेमी फायनलमध्ये लोळवल्यानंतर आता टीम इंडिया सलग दुसरी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यापासून एक विजयाने दूर आहे. टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेच्या इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची चौथी तर न्यूझीलंडची दुसरीच वेळ आहे. न्यूझीलंडने एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा यंदा ही प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला टीम इंडियाचा एकूण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याचा निर्धार आहे. त्यामुळे टीम इंडिया अंतिम सामन्यात पूर्ण ताकदीने उतरणार आहे. हा सामना 8 मार्चला होणार आहे. मात्र त्याआधी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

आयसीसीने टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचताच टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली आहेत. आयसीसीने कामगिरीच्या जोरावर एकूण 8 खेळाडूंना नामांकन जाहीर केली आहेत. या 8 खेळाडूंमध्ये 6 वेगवेगळ्या संघातील खेळाडूंचा समावेश आहे. तर आयसीसीने टीम इंडियाकडून संजू सॅमसन या एकट्याचीच निवड केली आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी संजूचा इतर 7 खेळाडूं विरुद्ध थेट सामना असणार आहे.

आयसीसीने निवडलेल्या या 8 खेळाडूंमध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी 2 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तर इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि यूएसए टीममधील प्रत्येकी 1 खेळाडूचा समावेश आहे. अशात आता आयसीसीने या पुरस्कारासाठी कुणाला नामांकन दिलं आहे हे जाणून घेऊयात.

संजू सॅमसन

संजू सॅमसन याची या स्पर्धेतील सुरुवात काही खास राहिली नाही. मात्र संजूने बाद फेरीत कमाल केली. संजूने वेस्ट इंडिज विरद्ध 97 आणि इंग्लंड विरुद्ध 89 धावांची निर्णायक खेळी करत भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. तसेच संजूने विकेटकीपिंगनेही जबरदस्त कामगिरी करुन दाखवली. संजूने एकूण 4 सामन्यांमध्ये सलग 2 अर्धशतकांसह 232 धावा केल्या. संजूने दोन्ही वेळा मोठ्या सामन्यात या धावा केल्या आहेत. त्यामुळे संजूच्या या खेळीचं फार महत्त्वं आहे. त्यामुळे संजू या पुरस्काराचा मानकरी ठरणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. तसेच संजूसमोर या पुरस्कारासाठी कुणाचं आव्हान आहे? हे जाणून घेऊयात.

शेडली व्हॅन शाल्कविक

यूएसएच्या या वेगवान गोलंदाजाने 4 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेत साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. शेडली व्हॅन शाल्कविक याने टीम इंडिया आणि पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात प्रत्येकी 4-4 विकेट्स मिळवल्या होत्या.

साहिबझादा फरहान

पारकिस्तानच्या या फलंदाजाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात एकूण 2 शतसकांसह 7 सामन्यांत 383 धावा केल्या.

विल जॅक्स

इंग्लंडच्या विल जॅक्स याने टीम इंडिया विरुद्ध उपांत्य फेरीत शतक झळकावलं. मात्र विल इंग्लंडला विजयी करण्यात अपयशी ठरला. विलने एकूण 8 सामन्यांत 226 धावांसह 9 विकेट्सही मिळवल्यात.

लुंगी एन्गिडी आणि एडन मार्करम

दक्षिण आफ्रिकेसाठी वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याने 7 सामन्यांमध्ये 12 विकेट्स मिळवल्या. लुंगीने या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात योगदान दिलं.

तसेच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने 8 सामन्यांमध्ये 286 धावा केल्या. मार्करमने विकेटही मिळवल्या. मात्र ते यंदाही चोकर्चसा शिक्का पुसण्यात यशस्वी ठरले नाहीत.

रचीन रवींद्र आणि टीम सायफर्ट

न्यूझीलंडच्या या ऑलराउंडरने 8 सामन्यांमध्ये 11 विकेट्स मिळवण्यासह 128 धावाही केल्या आहेत. भारतासमोर अंतिम फेरीत रचीनचं आव्हान असणार आहे.

तसेच न्यूझीलंडच्या टीम सायफर्ट याने 3 अर्धशतकांसह 8 सामन्यांमध्ये 274 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंजदाजांना अंतिम फेरीत या सायफर्टचा लवकरात लवकर काटा काढावा लागेल.

संजूला व्होट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

It’s a hot field as the eight nominees in the race to be named the #T20WorldCup Player of the Tournament have been unveiled 👀

Details 👇https://t.co/eM577zfYXs

— ICC (@ICC) March 6, 2026

आता आपल्या खेळाडूला हा पुरस्कार जिंकून द्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा मत नोंदवू शकता. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात मतदानसाठी लिंक दिली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिन करुन तुमच्या आवडत्या खेळाडूला हा पुरस्कार मिळण्याची संधी आणखी वाढेल. त्यामुळे हा पुरस्कार कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in