• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20i World Cup 2026 : वर्ल्ड कपआधी 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, पहिली मॅच केव्हा?

February 2, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत पहिल्यांदाच सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्याआधी टीम 2 सराव सामने खेळणार आहे. बीसीसीआयने या 2 सराव सामन्यांसाठी इंडिया ए टीम जाहीर केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआय निवड समितीने या 2 सराव सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. युवा आयुष बडोनी याच्याकडे इंडिया ए टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तसेच तिलक वर्मा याचंही कमबॅक झालं आहे. तिलकला रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागलेलं. तिलकची वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मुख्य संघात निवड करण्यात आली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यांसाठी इंडिया ए टीम : आयुष बडोनी (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, रवी बिश्नोई, नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्या, एन जगदीशन (विकेटकीपर), उर्विल पटेल (विकेटकीपर), मानव सुथार, अशोक शर्मा, गुरजपनीत सिंह, विपरज निगम, खलील अहमद आणि मयंक यादव.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in