• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20i World Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी मैदानात, सामना किती वाजता?

February 6, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी एकूण सहभागी 20 संघानी जोरदार सराव केला आहे. गतविजेता आणि यजमान असलेल्या टीम इंडियाने न्यूझीलंडवर 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. भारताने अशाप्रकारे या स्पर्धेआधी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या हंगामात पहिल्याच दिवशी 3 सामने होणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे संघही मैदानात असणार आहेत. या 3 सामन्यांत कोणत्या संघासमोर कुणाचं आव्हान असणार? हे आपण जाणून घेऊयात.

शनिवारी 3 सामने, पहिलाच सामना पाकिस्तानचा

टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ भिडणार आहेत. पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. नेदरलँड्स पाकिस्तानच्या तुलनेत नवखा संघ आहे. मात्र नेदरलँड्सने आतापर्यंत अनेक उलटफेर केले आहेत. त्यामुळे नेदरलँड्सला गृहीत धरता येणार नाही. तसेच पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पाकिस्तानला बाद फेरीत पोहचण्यासाठी साखळी फेरीतील सर्व सामने जवळपास जिंकावे लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तान नेदरलँड्स विरुद्ध कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विंडीज-स्कॉटलंड

स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात सी ग्रुपमधील विंडीज-स्कॉटलंड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. विंडीजने 2 वेळा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकलीय. तर स्कॉटलंडला यंदा बांगलादेशच्या जागी संधी देण्यात आली आहे. स्कॉटलंडने सुरक्षेच्या कारणामुळे भारतात खेळण्यास नकार दिलाय.

इंडिया-यूएसए आमनेसामने

स्पर्धेतील पहिल्याच दिवसातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. या दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिलाच सामना असणार आहे. गतविजेता टीम इंडिया यूएसए विरुद्ध खेळणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाने गेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत यूएसएला पराभूत केलं होंत. अशात यूएसए त्या पराभवाची वसूली करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : आर्मीतील जवानांना वर्षातून किती दिवस सुट्टी मिळते?
  • IND vs USA Pitch Report: भारत अमेरिका सामन्यात खेळपट्टी कशी असेल? फलंदाज की गोलंदाजाला मदत करेल!
  • Vivo चा स्टायलिश 5G फोन स्वस्त झाला, फिचर्स पाहून तुम्हीही आजच ऑर्डर कराल!
  • ‘या’ टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटर, एका फुल चार्जमध्ये 320 किलोमीटरपर्यंत धावतात, जाणून घ्या
  • T20i World Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी मैदानात, सामना किती वाजता?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in