• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20i World Cup 2026 : इंडियाला धक्का, आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफी परत घेणार, कारण काय?

March 9, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवत रविवारी 8 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धचा पहिलाच विजय ठरला. भारताने या विजयासह न्यूझीलंडच्या 3 पराभवांची परतफेड केली. टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील ही पहिलीच वेळ ठरली. तसेच टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तसेच सर्वाधिक 3 वेळा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला.

टीम इंडियाचा कारनामा

इंडिया सलग 2 आणि एकूण 3 टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारी पहिलीच टीम ठरली. तसेच इंडिया मायदेशात वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम ठरली. टीम इंडियाने अशाप्रकारे या विजयासह असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. भारताच्या या वर्ल्ड कप विजयाचा आनंद साऱ्या देशात साजरा केला जात आहे. मात्र या विजयाच्या 24 तासांनंतर आता ही आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी टीम इंडियाकडून परत घेतली जाणार आहे. आयसीसी टीम इंडियाकडून कोणत्या चुकीमुळे ही ट्रॉफी घेणार आहे का? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडियाकडून वर्ल्ड कप फायनलदरम्यान कोणतीही चूक झालेली नाही. तसेच भारताने कोणत्याही नियमाचं भंग केलेला नाही. मात्र त्यानंतरही ही ट्रॉफी भारताकडून घेतली जाणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार ही ट्रॉफी घेतली जाणार आहे.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमानुसार, विजयी संघाला खरी ट्रॉफी दिली जाते. खेळाडू या ट्रॉफीसोबत फोटो काढतात. त्यानंतर ती मुळ ट्रॉफी आयसीसीकडे सोपवण्यात येत. कोणत्याही विजयी संघाला खरीखुरी वर्ल्ड कप ट्रॉफी कायम स्वरुपी दिली जात नाही. विजयी संघाला आठवण म्हणून बनावट ट्रॉफी दिली जाते.

आयसीसीने 27 वर्षांआधी नियम केला होता. त्या नियमानुसार विजयानंतर विजेत्या संघाला मुळ ट्रॉफी दिली जाईल. टीमचे खेळाडू ट्रॉफीसोबत फोटो सेशन करतात. तसेच ट्रॉफीसोबत विजयी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर ती ट्रॉफी परत द्यावी लागते. त्यानंतर आयसीसी विजेता संघाला सेम टु सेम मात्र डुप्लीकेट ट्रॉफी देते. तर मुळ आयसीसी ट्रॉफी ही दुबईच्या मुख्यालयात ठेवण्यात येते. ट्रॉफी चोरी होऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून ट्रॉफी आयसीसी मुख्यालयात ठेवण्यात येते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in