• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20i : वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी? पहिला सामना कधी?

January 28, 2026 by admin Leave a Comment


इंग्लंड क्रिकेट टीमने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेवर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. इंग्लंडची मालिकेत पराभवाने सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडने सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. त्यांनतर आता उभयसंघात टी 20i मालिकेचा थरारा रंगणार आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका असणार आहे. श्रीलंकेने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहेत.

श्रीलंका-इंग्लंड टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, शुक्रवार, 30 जानेवारी, पल्लेकेले

दुसरा सामना, रविवार, 1 फेब्रुवारी, पल्लेकेले

तिसरा सामना, मंगळवार, 3 फेब्रुवारी, पल्ल्केले

इंग्लंड विरूद्धच्या टी 20I सीरिजसाठी श्रीलंका टीम : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडीस, कुसल जेनिथ परेरा, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, जेनिथ लियानागे, पवन रथनायके, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लागे, महेश तीक्षाना, दुष्मंथा चमीरा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथीराना आणि एशान मलिंगा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पत्नीचं गावातच झंगाट, प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम केला, अचानक 12 दिवसांनी…. सांगलीत काय घडलं?
  • फक्त कमवू नका, सुरक्षितही करा, 30 च्या वयात इस्टेट प्लॅनिंग का गरजेचं? जाणून घ्या
  • एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड
  • Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये
  • High Court on EVM: मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM ची तपासणी; मुंबई हायकोर्टाचा आदेश काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in