• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup India Champion: भारताने जेतेपद मिळवत एका झटक्यात 5 गैरसमज दूर केले, जाणून घ्या

March 9, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. पण अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असल्याने धाकधूक वाढली होती. कारण वनडे वर्ल्डकप 2023 कटू आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यात अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार असल्याने टेन्शन वाढलं होतं. पण भारताने अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. भारताने नाणेफेकीचा कौल गमवल्याने धाकधूक वाढली होती. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. भारताने 20 षटकात 255 धावा केल्या आणि विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही न्यूझीलंडला गाठता आलं नाही. भारताने हा सामना 96 धावांनी जिंकला. भारताने सलग दुसरं आणि इतिहासात तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. या विजयासह भारताने पाच गैरसमज दूर केले आहे.

1. गतविजेत्या संघाने सलग दुसऱ्यांदा जेतपद मिळवलं नाही. पण हा गैरसमज भारतीय संघाने विजयासह दूर केला. कारण भारत सलग दोन टी20 वर्ल्डकप जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. भारताने 2024 नंतर 2026 टी20 वर्ल्डकप जिंकला आहे.

2. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात यजमान संघ जेतेपद जिंकलेला नाही. नऊ पर्वात असंच चित्र पाहायला मिळालं होतं. पण दहाव्या पर्वात भारताने हा गैरसमज दूर केला आहे. भारताकडे या स्पर्धेचं यजमानपद होतं आणि जेतेपदही जिंकलं.

3. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे या मैदानात आयसीसी चषक जिंकत नाही असा समज होता. पण हा गैरसमजही दूर झाला. भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दणदणीत विजय मिळवला आहे.

4. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडचा संघ कायम टीम इंडियावर भारी पडला असा समज होता. कारण आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं होतं. पण यावेळी भारताने न्यूझीलंडला तशी संधी दिली नाही आणि जेतेपदावर नाव कोरलं.

5. न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धेत भारताच्या जेतेपदात खोडा घातला आहे, असाही गैरसमज होता. यापूर्वी 2000 साली न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेत भारताला पराभूत केलं होतं. पण भारताने यावेळी तसं होऊ दिलं नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in