• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup Final 2026 : टी20 वर्ल्ड कप जिंकला, आता चार दिवसात टीम इंडियातील या खेळाडूचं शुभमंगल सावधान

March 10, 2026 by admin Leave a Comment

दोनच दिवसांपूर्वी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील एक खेळाडू लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. तो आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. कुलदीप यादव 14 मार्च 2026 रोजी वंशिकासोबत विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. उत्तराखंडमधील सुंदर हिल स्टेशन मसूरी येथील एका लग्जरी रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या खास प्रसंगी दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि निवडक पाहुणे सहभागी होणार आहेत.

विवाहाच्या एकदिवस आधी 13 मार्चला हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पारंपारिक कार्यक्रमात कुटुंबिय आणि जवळचा मित्र परिवार सहभागी होईल. उत्साह, आनंद आणि सेलिब्रेशनचं वातावरण असेल. कुलदीप आणि वंशिकाचा साखरपुडा 4 जून 2025 रोजी लखनऊच्या एका हॉटेलमध्ये झाला होता. आधी दोघांचं लग्न नोव्हेंबर 2025 मध्ये ठरलं होतं. पण भारतीय क्रिकेट टीमचं व्यस्त कॅलेंडर आणि टी20 वर्ल्ड कप टीममध्ये कुलदीपची निवड झाल्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली.

लग्न सोहळ्यात कोण-कोण सहभागी होणार?

कुलदीप यादवचे वडिल रामसिंह यादव यांनी 8 मार्च रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली व त्यांना लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. लग्नानंतर 17 मार्चला लखनऊच्या हॉटेल सेंट्रम येथे भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोशिएशनचे अधिकारी, भारतीय क्रिकेट टीममधील विद्यमान आणि माजी क्रिकेटपटू आणि अन्य पाहुणे सहभागी होऊ शकतात.

तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याच्या नावावर किती विकेट?

कुलदीप यादव आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 टीममध्ये होता. या टुर्नामेंटमध्ये कुलदीप फक्त एक सामना खेळला, तो ही पाकिस्तान विरुद्ध. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कुलदीपने फक्त 14 रन्स देऊन एक विकेट काढला. चायनामन गोलंदाजी करणारा कुलदीप यादव तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून आतापर्यंत 191 सामने खेळलाय. या दरम्यान त्याने 22.50 च्या सरासरीने 4.84 च्या इकोनॉमी रेटने 365 विकेट काढले आहेत. 31 वर्षाच्या कुलदीप यादवने आतापर्यंत 9 वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट काढले आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in