• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup Final : काय सांगता, फायनल मॅचमध्ये बॉल हरवला? थेट तक्रार दाखल; पोलीस म्हणाले…सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा!

March 9, 2026 by admin Leave a Comment

T20 World Cup Final Match : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. भारताच्या या कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. या विजयासह भारत हा सर्वाधिकवेळा टी-20 विश्वचषक स्पर्ध जिंकणार देश ठरला आहे. याआधी भारताने 2007, 2024 साली ही स्पर्धा जिंकली होती. सोशल मीडियावर सगळीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचीच वाहवा चालू आहे. या अतिंम सामन्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. दरम्यान, याच सामन्याची भुरळ अहमदाबाद, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनाही पडली आहे. सामना सुरू असताना या तिन्ही पोलिसांनी एक्सवर केलेल्या पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलंय?

भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना सुरू असताना उत्तर प्रदेश पोलीस, दिल्ली पोलीस आणि अहमदाबाद पोलिसांनी मजेदार ट्वीट केले आहेत. सामन्यात भारत अगोदर फलंदाजी करायला मैदानात उतरला होता. यावेळी भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होते. भारतीय संघाची ही आक्रमक खेळी पाहून सर्वात अगोदर दिल्ली पोलिसांनी अहमदाबाद पोलिसांना टॅग करून एक मजेदार ट्वीट पोस्ट केले. ‘डिअर अहमदाबाद पोलीस, न्यूझीलंडच्या संघाकडून चेंडू वारंवार गायब होत असल्याची तक्रार दाखल झाली आहे. परंतु या तक्रारीला गांभीर्याने घेऊ नका. कारण भारताचे फलंदाजच हा चेंडू वारंवार स्टेडियममध्ये पाठवत आहेत,’ असे या ट्वीटमध्ये म्हटले होते.

CASE STATUS UPDATE 🚔

Earlier complaint: Ball going missing.
New complaint: Entire batting lineup going missing.
Our assessment: This is not a law & order problem.
This is Bumrah. 🎯🇮🇳#INDvNZ #T20WorldCup2026Final pic.twitter.com/218PYJQ9r6

— UP POLICE (@Uppolice) March 8, 2026

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिले मजेदार प्रत्युत्तर

विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांच्या या ट्वीटला अहमदाबाद पोलिसांनीही मजेदार उत्तर दिले आहे. ‘आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. आम्ही ही तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे,’ असं उत्तर अहमदाबाद पोलिसांनी दिले. विशेष म्हणजे यात उत्तर प्रदेशच्या पोलिसांनीही उडी घेतली. त्यांनी दिल्ली पोलिसांना टॅग करून ‘आता तक्रारीचे स्टेटस अपडेट करण्यात आले आहे. चेंडू गायब होत असल्याची अगोदरची तक्रार होती. आता आमचे सगळे फलंदाजच गायब होत असल्याची तक्रार आली आहे. परंतु आमच्या मतानुसार या सगळ्याच्या मागे भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज बुमराह हा आहे,’ असे मजेदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पोलीस विभागाच्या या मजेदार ट्वीटची सगळीडे चर्चा होत आहे. सामान्यांनीही यावर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in