
यजमान टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला पहिला तर एकूण तिसरा सामना यूएसए विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर मुळचा गुजरातचा असणार्या मोनांक पटेल याच्याकडे यूएसएच्या कर्णधारपदाची धुरा आहे. टीम इंडियाने गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत यूएसएला पराभूत केलं होतं. तसेच यूएसएने चांगली लढत दिली होती. आता यूएसए या सामन्यात गतविजेत्या टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Leave a Reply