• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup 2026 Final: इशान किशनचं अर्धशतक,गर्लफ्रेंड आदिती हुंदियावर उभं राहण्याची वेळ

March 10, 2026 by admin Leave a Comment

Ishan Kishan T20 World Cup Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि भारताने 20 षटकात 255 धावा केल्या. तसेच विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. या धावसंख्येत आघाडीच्या तीन फलंदाजांचं योगदान राहिलं. संजू सॅमसनने 46 चेंडूत 89, अभिषेक शर्माने 21 चेंडूत 52 आणि इशान किशनने 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. इशान किशन फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची धावगती योग्य ट्रॅकवर होती. त्यात त्याने आणखी धार दिली. इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं यावरून त्याने काय फटकेबाजी केली याचा अंदाज येतो. अभिषेक शर्मा संघाच्या 98 धावा असताना बाद झाला. आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याची विकेट गेली. त्यामुळे धावगती राखण्याचं आव्हान इशान किशनवर होतं. त्यात त्याला यशही मिळालं.

डावखुऱ्या इशान किशनने पहिल्या चेंडूपासून आक्रमक बाणा दाखवला. त्याने त्याच्या डावात 4 षटकार आणि 4 चौकार मारले. ईशान किशनने 216 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याची खेळी पाहून मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं. हा सामना पाहण्यासाठी इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंदिया ही देखील मैदानात उपस्थित होती. इशान किशनच्या प्रत्येक चौकार षटकारावर ती त्याचा जल्लोषात स्वागत करत होती. इशानची आक्रमक फलंदाजीमुळे तिला सीटवर बसताच आलं नाही. वारंवार चीअर करावं लागत होतं.

Ishan kishan Won in life 🤌🏻 pic.twitter.com/ShDZS2Erf1

— 𝙎. (@KLfied_) March 8, 2026

इशान किशनने या स्पर्धेतील 9 सामन्यात 35.22 च्या सरासरीने 317 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 193.29 चा राहिला. खरं तर गेल्या काही वर्षांपासून इशान किशन टीम इंडियातून बाहेर होता. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यापासून त्याला संघात स्थान काही मिळत नव्हतं. पण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्या जोरावर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत स्थान मिळालं. या मालिकेत त्याची कामगिरी जबरदस्त झाली. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in